मुंबई - बॉलिवूडची ग्लॅमरस आणि प्रतिभावंत अभिनेत्री करीना कपूरने बॉलिवूडमध्ये 14 वर्षे पूर्ण केली आहेत. 'रेफ्युजी' या सिनेमाद्वारे करीनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा सिनेमा आजच्या दिवशी म्हणेजे 2 जुलै रोजी रिलीज झाला होता. आपल्या 14 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये करीनाने अभिनयासोबत आपले लूक्स आणि स्टाईलवर भरपूर मेहनत घेतली आहे. आज करीना बी टाऊनमधील ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये गणली जाते. फॅशन आणि सिनेमे दोन्ही बाजूंवर तिने स्वतःला सिद्ध केले आहे.
करीना कपूरने 2000 मध्ये जे.पी.दत्ता यांच्या 'रेफ्युजी'द्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. हा सिनेमा भारत-पाकिस्तानच्या 1971च्या युद्धावर आधारित होता. या सिनेमाद्वारे करीनासह अभिषेक बच्चननेसुद्धा आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. 'रेफ्यूजी'पूर्वी करीनाला हृतिक रोशन स्टारर 'कहो ना प्यार है' या सिनेमात कास्ट करण्यात आल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. सिनेमातील काही दृश्यसुद्धा करीनावर चित्रीत करण्यात आले होते. मात्र नंतर हा सिनेमा तिला सोडावा लागला.
'रेफ्युजी' या सिनेमातील करीनाच्या भूमिकेचे समीक्षकांनी कौतुक केले होते. या सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा अवॉर्ड मिळाला होता. या सिनेमानंतर 2001मध्ये करीना 'मुझे कुछ कहना है' या सिनेमात तुषार कपूरसोबत झळकली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील कमाईचे रेकॉर्ड मोडित काढले आणि करीनाची करिअरची गाडी सुसाट सुटली.
'चमेली' सिनेमातील शानदान अभिनयाने वाढली लोकप्रियता..
तसं पाहता करीनाची कपूरची फॅन फॉलोईंग तिच्या पहिल्या सिनेमापासूनच तयार झाली होती. मात्र 2004मध्ये रिलीज झालेल्या 'चमेली' या सिनेमाने करीनाची गणना प्रतिभावंत अभिनेत्रींमध्ये होऊ लागली. या सिनेमात करीनाने गोल्डन हार्टेड वेश्याची भूमिका साकारली होती. त्यानंतर 'ओमकारा'मध्ये झळकली. 'चुप चुप के' या सिनेमात मुक तरुणीची भूमिका साकारुन तिने स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि 24 छायाचित्रांमध्ये पाहा करीनाचा आत्तापर्यंतचा बॉलिवूड प्रवास...