आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्री, प्रेमावर भाष्‍य करणारा, संगीतात टवटवीतपणा आणणारा ‘मितवा’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मैत्री आणि प्रेमावर वेगळ्या दृष्टिकोनातून भाष्य करण्याचा प्रयत्न करणारा ‘मितवा’ हा चित्रपट येत्या १३ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात संगीतातील ताजेतवाना आणण्याचाही दिग्दर्शकाने प्रयत्न केला आहे.

स्वप्निल जोशी, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. चित्रपटातील ‘सावर रे’, ‘तू ही रे माझा मितवा’ ही गाणी सध्या लोकप्रिय ठरत आहेत. महाविद्यालयीन तरुणांमध्ये सध्या या गाण्यांची क्रेझ आहे.‘सत्यम शिवम सुंदरम’ या गाण्याच्या माध्यमातून दिग्दर्शकाने मराठीमध्ये डिस्काेथेक गाणे देण्याचा प्रयत्न केला आहे. मीनाक्षी सागर यांची निर्मिती आणि स्वप्ना वाघमारे-जोशी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटास शंकर-एहसान-लॉ य यांचे संगीत आहे. शिवाय पंकज पडघन, अमितराज आणि नीलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेली गाणी व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर अत्यंत ताजी व नवा अनुभव देणारा ठरतील, असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे.
या चित्रपटाची कथा व संगीत मराठीमध्ये एका नव्या प्रेमकथेला प्रेक्षकांसमोर दिग्दर्शक साकारणार आहेत.

पुढे वाचा नवा चेहरा, नवा लूक