आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Friday Release: Bang Bang And Haider Released On 2 October

150 कोटींचा आहे \'बँग बँग\', म्यूझिक हक्क विकून कमावले 50 कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आठवड्यात 'बँग बँग' आणि 'हैदर'चे प्रदर्शन झाले. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीची सरकारमान्य सुट्टी असल्याने दोन्ही सिनेमांनी फायदा घेण्यासाठी त्याच दिवशी रिलीज होण्याचा निर्णय घेतला. जगभरातील प्रिन्ट आणि प्रचाराच्या खर्चासह निर्माता फॉक्स स्टुडिओला 'बँग बँग'चा 150 कोटींमध्ये पडला.
प्रदर्शनापूर्वीच सॅटेलाइट म्यूजिक अधिकार विकून 50 कोटी सिनेमाने वसूल केले आहेत. या सिनेमाने सुरुवातीलाच प्रोमोने प्रेक्षकांच्या मनात उत्सूकता निर्माण केली होती.
सिनेमाची क्रेज पाहता या महागड्या सिनेमाला खर्च केलेले पैसे वसूल करण्यास काहीच वेळ लागणार नाही. परंतु खर्चाव्यतिरिक्त किती फायदा होणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. परदेशात हा सिनेमा जास्त व्यवसाय करणार अशा अपेक्षा आहेत. याचेही तिन कारणे आहेत. पहिले म्हणजे, फॉक्स स्टार आंतरराष्ट्रीय स्टुडिओ आहे आणि प्रसिध्दीच्या बळावर ज्या देशात हिंदी सिनेमे लागत नाहीत तिथेही हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे.
दुसरे कारण म्हणजे, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये हृतिक रोशन आणि कतरिना कैफची लोकप्रियता. तिसरे कारण म्हणजे, हा सिनेमा 'नाइट अँड डे' या हॉलिवूड सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.
विशाल भारद्वाज नेहमीच हटके सिनेमे करण्यास पसंती देतात. 'हैदर' शेक्सपिअरच्या हेमलेटवर बेतलेला आहे. या सिनेमाची सर्वात मजबूत बाजू म्हणजे, याचे व्यवसायिक समीकरण आहे. सिनेमात नायक शाहिद कपूर, दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि निर्माती यूटीव्ही तिघे बरोबरीचे भागीदार आहेत.
सिनेमामध्ये काम केल्याच्या बदल्यात शाहिद आणि विशाल यांनी खूप कमी मानधान घेतले आहे. याच कारणामुळे मोठ्या स्टारकास्टचा हा सिनेमा प्रिन्ट आणि प्रचाराच्या खर्चासह यूटीव्हीला 40 कोटींमध्ये पडला. खर्च काढण्यासाठी यूटीव्ही कोणतेच व्याज किंवा कमीशन घेणार नाहीये. सिनेमाचा पुढील व्यवसाय तिन भागांमध्ये एकसमान विभागला जाणार आहे.