आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Friday Release:पाहा \'भूतनाथ रिटर्न्स\'ची खास झलक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - या फिल्मी फ्रायडेला अमिताभ बच्चन स्टारर आणि 2014 या वर्षातील बहूचर्चित 'भूतनाथ रिटर्न्स' हा सिनेमा रिलीज झाला आहे. या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणारा हा एकमेव सिनेमा आहे. मात्र या एका बॉलिवूड सिनेमासह दोन हॉलिवूड सिनेमे या शुक्रवारी भारतात रिलीज होत आहेत. यापैकी एक सिनेमा म्हणजे 'रियो' हा थ्रीडी अॅनिमेशनपट आणि दुसरा हॉलिवूड सिनेमा म्हणजे 'ऑक्यूलस'.
निवडणुकीचे वारे वाहत असल्यामुळे या शुक्रवारी रिलीज होणा-या दोन सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.
या दोन सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकण्यात आली आहे -
* कोच्चाडियान आता 1 मे रोजी रिलीज होणार आहे.
* कांची आता 25 मे रोजी रिलीज गोमाक आहे.
11 एप्रिल रोजी 'भूतनाथ रिटर्न्स' हा एकमेव बॉलिवूड सिनेमा रिलीज होत असल्यामुळे याचा सरळसरळ फायदा सिनेमाला होऊ शकतो.
'भूतनाथ रिटर्न्स' हा हॉरर कॉमेडी ड्रामा असून 2008मध्ये रिलीज झालेल्या 'भूतनाथ' या सिनेमाचा सिक्वेल आहे. 'भूतनाथ'मध्ये अमिताभ बच्चन भूताच्या भूमिकेत होते, तर शाहरुख खान सहायक अभिनेत्याच्या रुपात झळकला होता.
'भूतनाथ रिटर्न्स'मध्ये अमिताभ यांच्यासह बोमन इराणी, अनुराग कश्यप आणि उषा जाधव महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. तर शाहरुख खान आणि रणबीर कपूर यांचा स्पेशळ अपिअरन्स आहे.
नितेश कुमार दिग्दर्शित या सिनेमाचे भूषण कुमार आणि अभय चोप्रा निर्माते आहेत. सलीम-सुलेमान याचे संगीतकार आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'भूतनाथ रिटर्न्स'ची खास झलक छायाचित्रांमध्ये...