आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Friday Release: पाहा अरमान-दीक्षाच्या रोमान्सची झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अरमान जैन आणि दीक्षा सेठ
करिश्मा, रणबीर, करीना कपूर यांचा आतेभाऊ तसेच, त्यांची आत्या रीमा जैन यांचा मुलगा आणि राज कपूर यांचा नातू अरमान जैन बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यास सज्ज झाला आहे. 4 जुलैला अर्थातच आज त्याचा मुख्य भूमिका असलेला 'लेकर हम दिवाना दिल' सिनेमा रिलीज झाला आहे.
'लेकर हम दिवाना दिल' अरमानचाच नव्हे तर सिनेमाची हीरोईन दिक्षा सेठ आणि दिग्दर्शक आरिफ अली यांच्याही पदार्पणाचा सिनेमा आहे. आरिफ प्रसिध्द दिग्दर्शक इम्तियाज अलीचा भाऊ आहे. सिनेमाची कहानी दोन मित्रांची आहे. ते त्यांच्या निर्णयावर पश्चाताप करतात आणि नंतर स्वत:च्याच आयुष्यातून धडा घेतात. सिनेमा चुका आणि त्यावरील होणारे परिणाम तसेच धडा देणा-या विषयावर आधारित आहे. सिनेमात दोन्ही स्टार्स नवीन असल्याने दोघांचा रोमान्स कसा असणार हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सिनेमाची कहानी दिनेश अर्थातच डीनो (अरमान) आणि करिश्मा (दिक्षा सेठ) यांच्या भोवती गुंफलेली आहे. दोघांमध्ये सिनेमात चांगली मैत्री असते. एके दिवशी दोघेही घरातून पळून जाऊन लग्न करतात. त्यानंतर त्यांच्या समोर अनेक समस्या येतात. दोघांना त्यांच्या चुकिचा पश्चाताप होतो. सिनेमा तरुणांच्या रुचीकडे बघून बनवण्यात आला आहे. सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच 'खलीफा' हे गाणे हिट झाले आहे.
या सिनेमाची निर्मिती त्याचा भावोजी सैफ अली खानने केले असून दिग्दर्शन आरिफ अलीने केले आहे. आरिफ अली इम्तियाज अलीचा भाऊ आहे. 'रॉकस्टार' फेम दिग्दर्शक-अभिनेता इम्तियाज अली आणि रबणीर यांची गट्टी आहे. दोघेही आपआपल्या भावांना सिनेमामध्ये मदत केली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'लेकर हम दिवाना दिल' सिनेमामधील अरमान आणि दीक्षा यांचा रोमान्स...