आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Friday Release: \'O Teri\', \'Youngistaan\', \'Dishkiyaoon\', \'Station\', Tapatpadi

Friday Release: 4 हिंदी आणि 4 मराठी सिनेमाची सिनेरसिकांना ट्रीट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडमध्ये सध्या एकामागून एक सिनेमे रिलीज होण्याचा धडाका लागला आहे. गेल्या दोन ते तीन फिल्मी फ्रायडेला एक किंवा दोन नव्हे तर चार बिग बजेट सिनेमे रिलीज झाले.
गेल्या आठवड्याप्रमाणेच या फिल्मी फ्रायडेलासुद्धा अनेक सिनेमांचा ऑप्शन सिनेरसिकांकडे आहे. या आठवड्यात तब्बल चार हिंदी आणि एका मराठी सिनेमाची ट्रीट सिनेरसिकांना मिळणार आहे. हिंदीत ओ तेरी, यंगिस्तान, ढिश्कियाऊं आणि स्टेशन तर मराठी तप्तपदी हा सिनेमा रिलीज झाला.
हिंदीत चार सिनेमे रिलीज झाले खरे, मात्र यापैकी कोणत्या सिनेमाची जादू सिनेरसिकांवर चालणार हे लवकरच स्पष्ट होईल. या सर्वचही सिनेमातील स्टार्सनी आपापल्या सिनेमांचे जोरदार प्रमोशन केले. हिंदीत रिलीज झालेल्या सिनेमांकडे एक नजर टाकली असता नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
गेल्या आठवड्याविषयी सांगायचे झाल्यास 'रागिनी MMS-2’, ‘आंखों देखी’, ‘लक्ष्मी’ और ‘गैंग ऑफ घोस्ट्स’ हे सिनेमे रिलीज झाले होते. यापैकी 'रागिनी MMS-2’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला. या सिनेमाने आत्तापर्यंत तीस कोटींहून अधिक व्यवसाय केला आहे. या सिनेमाच्या तुलनेत इतर सिनेमांनी फारशी कमाल दाखवली नाही. मात्र लक्ष्मी आणि आँखो देखी या सिनेमांचे समीक्षकांनी कौतुक केले.
हिंदीसह मराठीतही एकुण चार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. रवींद्रनाथ टागोर यांच्या दृष्टिदान कथेवर आधारित मराठवाड्याचा सचिन नागरगोजे ‘तप्तपदी’ सिनेमा घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे. सचिनचा हा पहिलाच प्रयत्न असून मराठी इंडस्ट्रीमध्ये या चित्रपटाबद्दल चांगलीच उत्सुकता आहे. या सिनेमातून कश्यप परुळेकर, वीणा जामकर, श्रुती मराठे वेगळ्या भूमिकांमधून दिसणार आहेत. स्वत: सचिनही आपल्या या पहिल्या सिनेमाबाबत प्रचंड आहे.
‘लक्ष्मी तुझ्याविना’ हा ग्रामीण आणि शहरी प्रेक्षकांना आकर्षित करणारा, प्रेमाची महती सांगणारा रहस्यपट असल्याचे दिग्दर्शक विशाल तेलंग याने सांगितले. या सिनेमातून छोट्या शहरातल्या महिलांच्या सबलीकरणाचा संदेश देण्यात आला आहे. दीपक कदम दिग्दíशत या सिनेमातून संजय शेजवळ, सई रानडे आणि प्रियंका ज्ञानलक्ष्मी पदार्पण करीत आहेत. या दोन सिनेमांबरोबरच ‘अरे सोडा बाटली बाई’ आणि मकरंद अनासपुरे अभिनीत ‘असा हा अतरंगी’ हे सिनेमेही प्रदर्शित होत आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या या आठवड्यात रिलीज झालेल्या हिंदी सिनेमांविषयी...