मुंबईः सिल्व्हर स्क्रिनवर आज प्रियांका चोप्राची प्रमुख भूमिका असलेला 'मेरी कोम' हा सिनेमा रिलीज झाला.
बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा यशस्वी करण्यासाठी प्रियांकाने जीवतोड मेहनत घेतली आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती छोट्या-मोठ्या प्रकारच्या सर्व इव्हेंट्समध्ये सहभागी झाली. हा सिनेमा बॉक्सर मेरी कोमच्या आयुष्यावर बेतला आहे. मेरी कोमच्या भूमिकेत प्रियांका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
बॉक्सरची भूमिका साकारण्यासाठी प्रियांकाने
आपल्या बॉडीवर विशेष मेहनत घेतली. तिने सिनेमासाठी मसल्स तयार केले. मेरी कोमवर प्रियांकाने चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासून आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केल आहे. त्यामुळे या सिनेमाचे यश प्रियांकाच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. उमंग कुमार दिग्दर्शित हा सिनेमा संजय लीला भन्साळी यांची निर्मिती आहे.
'मेरी कोम'चा ट्रेलर...
यूट्युबवर या सिनेमाचा ट्रेलर आत्तापर्यंत 48 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून लाइकसुद्धा केला आहे. तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये प्रियांका आपल्या अभिनयाची छाप सोडते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा मेरी कोम सिनेमातून घेण्यात आलेली प्रियांकाची खास छायाचित्रे...