आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Friday Release: छायाचित्रांमध्ये पाहा, आलिया-अर्जुनच्या `2 स्टेट्स`ची झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आलिया भट्ट आणि अर्जुन कपूर अभिनीत '2 स्टेट्स' हा सिनेमा आज (18 एप्रिल) रिलीज झाला. हा एक रोमँटिक-ड्रामा आहे. सिनेमाची कहाणी काही वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या चेतन भगत लिखीत '2 स्टेट्स' या कादंबरीवर रेखाटण्यात आली आहे. सिनेमात अर्जुन आणि आलियाने रोमँटिक जोडीची भूमिका साकारली आहे.
'2 स्टेट्स'मध्ये पंजाबी तरुण आणि दाक्षिणात्य तरुणी यांची प्रेमकथा चित्रीत करण्यात आली आहे. चेतन भगतच्या कादंबरीला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. कदाचित यामुळेच सिनेमाच्या निर्मात्यांनी आजच्या तरुणाईला लक्षात घेऊन या कादंबरीवर हा सिनेमा बनवला आहे. हा सिनेमा तरुणाईच्या पसंतीस उतरू शकतो याचा विचार निर्मात्यांनी केलेला दिसून येत आहे. तसे पाहता, सिनेमाची कहाणी तरुणाईच्या जिव्हाळ्याच्या विषयावर आधारित आहे.
सिनेमाचा दिग्दर्शक अभिषेक वर्मन असून साजिद नाडियाडवाला आणि करण जोहर यांनी मिळून सिनेमा निर्मित केला आहे. '2 स्टेट्स'मध्ये अर्जुन क्रिश मल्होत्रा आणि आलिया अनन्या स्वामीनाथनच्या भूमिकेत दिसणार आहेत. या दोन्ही स्टार्सव्यतिरिक्त सिनेमात रोनित रॉय, अमृता सिंह, रेवती आणि अंकिता चित्राल यांच्यासुध्दा महत्वपूर्ण भूमिका आहेत.
तरुणाईला आपल्या लेखन शैलीने भूरळ घालणारा लेखक चेतन भगतच्या '2 स्टेट्स'चे सिनेमामध्ये कसे रुपांतर करण्यात आले आहे हे तुम्हाला थिएटरमध्ये गेल्यानंतरच कळेल. परंतु सिनेमाचा फस्ट लूक लोकांच्या बराच पसंतीस उतरला आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला ‘2 स्टेट्स’ या सिनेमाची खास झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा ‘2 स्टेट्स’ची खास छायाचित्रे...