आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Friendship Day : Know About Best Friend Of Bollywood Stars

Frdship Day: बॉलिवूड स्टार्सही म्हणतात 'तेरे जैसा यार कहा...', जाणून घ्या यांच्या निखळ मैत्रीविषयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: आलिया भट्ट आणि सलमान खान
मुंबई: जगात अनेक प्रकारची नाती असतात. परंतु त्यात मैत्रीचे नाते सर्वात अनोखे आणि आपलेपणाची भावना जागवणारे असते. त्याची प्रत्येक तार आपल्या मनाशी जोडलेली असते. सर्वांप्रमाणे बॉलिवूड स्टार्सचेही काही खास मित्र-मैत्रीणी आहे. त्यांच्यासह ते वेळ काढून धमाल-मस्ती करणे पसंत करतात. फ्रेंडशिप डेच्या निमित्त DivyaBhaskar.Com तुम्हाला काही स्टार्स आणि त्याच्या मित्राची माहिती घेऊन आले आहे. जाणून घ्या कोणत्या व्यक्तीला हे बी-टाऊनचे स्टार्स मानतात सर्वात खास मित्र...
आलिया भट्ट: वरुण धवनला मानते सर्वात चांगला मित्र
'मी वरुणला माझा सर्वात चांगला मित्र मानते. कारण तो मला खूप चांगला वाटतो. त्याच्यासोबत असल्यावर मी खूप आनंदी असते. तो मला खूप हसवतो. त्याचे सेन्स ऑफ ह्यूमर उत्कृष्ट आहे. त्याच्या प्रत्येक बोलण्यात काही ना काही जोक्स दडलेले असतात. आम्हीसोबत असल्यावर तो माझी खूप काळजी घेतो. एकदा 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया'च्या सेटवर मी खाली पडले आणि मला किरकोळ जखम झाली. त्यावेळी वरुण इतका अस्वस्थ झाला, की यापूर्वी मी त्याला असे कधीच पाहिले नव्हते. आम्ही 'स्टुडेंट ऑफ द इअर'पासून एकत्र काम करत आहोत. तेव्हापासून आमची मैत्री आहे आणि आजही कायम टिकून आहे. त्याच्या मैत्रीत कोणतेच स्वार्थ नाहीये. तो खूप कोमल मनाचा व्यक्ती आहे. त्यामुळे वरुण माझा सर्वात चांगला मित्र आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर स्टार्स कोणाला मानतात आपला चांगला मित्र...