आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

F'DAY SPL : 'दोस्तों की दुनियादारी में हसीन मेरी जिंदगी...'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आपल्या मैत्रीसाठी जीवाचं रान करणारे जिगरी दोस्त... कट्यावरची धमाल, टपरीवरची कटींग, कॉलेजमधले मंतरलेले दिवस आणि कॉलेजमधून बाहेर पडल्यावरही कालातीत टिकून राहिलेली मैत्री.. या सगळ्याचा जिवंत अनुभव घेऊन अवतरलेली ही सदाबहार 'दुनियादारी' प्रेक्षकांनी आपली केली. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, तरी तरुणाईची 'दुनियादारी' तीच आहे. सुहास शिरवळकरांच्या गाजलेल्या 'दुनियादारी' या कांदबरीवर दिग्दर्शक संजय जाधव यांनी 'दुनियादारी' हा सिनेमा सिनेरसिकांच्या भेटीला आणला. अलीकडेच रिलीज झालेल्या या सिनेमाला थिएटरमध्ये हाऊसफूल्लचे बोर्ड लागले आहेत.

या सिनेमातील 'जिंदगी जिंदगी...' हे मैत्रीवर आधारित असलेलं गाणं तरुणाईच्या ओठी रेंगाळत आहे.
आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आम्ही खास तुमच्यासाठी हे गाणं घेऊन आलो आहोत. मराठी चित्रपटसृष्टीत अकरा कलाकारांनी हे गाणं आपल्या आवाजात स्वरबद्ध केलंय.

व्हिडिओवर क्लिक करुन बघा अकरा कलाकारांनी मिळून गायलेल्या आणि निखळ मैत्रीचा अनुभव देणा-या गाण्याची खास झलक...