आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From Childhood Till Now, See Personal Life Pics Of Rani Mukherjee

बालपणीपासून ते आतापर्यंत, पाहा \'मर्दानी\' राणीची न पाहिलेली छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- राणी मुखर्जी)
मुंबई: जवळपास दोन वर्षांनंतर राणी मुखर्जीने एक अभिनेत्री म्हणून रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले आहे. शुक्रवारी (22 ऑगस्ट) रिलीज झालेल्या तिच्या 'मर्दानी' सिनेमाची समीक्षकांसह प्रेक्षकांनीही प्रशंसा केली आहे. राणीच्या मर्दानी अवताराची स्तुती ऐकायला मिळत आहे. 36 वर्षीय राणी जवळपास 17 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. 1997मध्ये तिने 'राजा की आएगी बारात' सिनेमातून एंट्री केली होती. जाणून घेऊया राणीविषयी काही रंजक गोष्टी...
मुंबईमध्ये झाला जन्म
राणी मुखर्जीचा जन्म 21 मार्च 1978 रोजी मुंबईमध्ये झाला. तिचे वडील राम मुखर्जी सिनेमा दिग्दर्शक आणि आई कृष्णा मुखर्जी पार्श्वगायिका. राणीला एक भाऊसुध्दा आहे. त्याचे नाव राजा मुखर्जी असून तो सिनेमा निर्माता आहे. राणीने मुंबईच्या कूपर हायस्कुलमधून शालेय शिक्षण आणि एसएनडीटी वुमन यूनिव्हर्सिटीमधून पदवीशिक्षण पूर्ण केले.
वयाच्या 14व्या वर्षी केली अभिनयास सुरुवात
राणीने 1997मध्ये जरी बॉलिवूडमध्ये एंट्री केली असे म्हटले जाते. मात्र तिने पाच वर्षांपूर्वी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. 1992मध्ये आलेल्या 'बियेर फुल' सिनेमात तिने काम केले तेव्हा ती केवळ 14 वर्षांची होती.
सलमानच्या वडिलांची ऑफर नाकारली
1994मधील गोष्ट़ आहे, राणीने बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचे वडील सलीम खान यांच्या 'आ गले लग जा' सिनेमात काम करण्यास नकार दिला होता. कारण एवढेच होते, की ती त्यावेळी खूप लहान होती. तिच्या वडिलांना एवढ्या लहान वयात तिला अभिनयाच्या क्षेत्रात जाऊ देण्याची इच्छा नव्हती.
1998मध्ये मिळाले यश
1998मध्ये दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या 'गुलाम' सिनेमात राणी आमिर खानसह मुख्य भूमिकेत दिसली होती. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमानंतर राणीला सिनेमांचे ऑफर यायला लागल्या. त्यानंतर ती 'कुछ कुछ होता है' (1998), 'हॅलो ब्रदर' (1999), 'हद कर दी आपने' (2000), 'साथिया'(2002), 'कल हो न हो' (2003), 'युवा'(2004), 'ब्लॅक' (2005), 'नो वन किल्ड जेसिका' (2011) आणि 'बॉम्बे टॉकीज' (2013)सारखे अनेक सिनेमांमध्ये काम केले.
2014मध्ये अडकली लग्नगाठीत
राणी मुखर्जी 21 एप्रिल 2014मध्ये सिनेमा दिग्दर्शक आदित्य चोप्रासह लग्नगाठीत अडकली. लग्नापूर्वी आदित्य आणि तिच्या अफेअरच्या चर्चा समोर आल्या होत्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा राणीच्या बालपणीपासून ते आतापर्यंतची निवडक छायाचित्रे...