(संग्रहित छायाचित्र - हाजी मस्तान आणि अभिनेत्री सोना (बेहम मिर्जा))
नेस वाडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा यांच्यातील वादाला अंडरवर्ल्डच्या धमकीमुळे आत एक वेगळेच वळण मिळाले आहे. नेस यांचे वडील नुस्ली वाडीया यांना डॉन रवी पुजारीने "प्रीतीपासून दूर राहा अन्यथा व्यवसायात फार मोठे नुकसान करू" अशा शब्दात धमकी दिली आहे.
बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डचे संबंध फार जुने आहेत. कधी एखाद्या अभिनेत्यासोबत तर कधी एखाद्या अभिनेत्रीसोबतच्या प्रेमप्रकरणामुळे बॉलिवूड आणि माफियांचे संबंध नेहमीच जुळलेले दिसतात. असे सांगण्यात येते की, या संबंधांची सुरुवात 70 च्या दशकात मुंबईचा पहिला डॉन असलेल्या हाजी मस्तानपासून झाली होती.
हाजी यांचे खरे नाव मस्तान हैदर मिर्जा असे होते. हाजी मस्तानला सोना नावाची एक अभिनेत्री खुप आवडली. तिच्यासाठी हाजीने अनेक चित्रपटांना पैसा लावला. काही चित्रपट करायला लावले. असे ऐकण्यात येते की, हाजीने सोनासाठी महागड्या भेटवस्तू तसेच एक आलिशान बंगलाही भेट दिला होता.
काही वर्षांपूर्वी आलेला एकता कपूरचा चित्रपट ‘वन्स अपॉन टाइम इन मुंबई’ यामध्ये हाजी मस्तानच्याच जीवनाला मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले होते. मात्र, एकता कपूरने या बातमीचा विरोध केला आहे. पण या चित्रपटाची कथा बहूतांशी हाजीच्या जीवनाशी मिळतीजूळती होती.
हाजी जरी मुंबईचा डॉन असला तरी, त्याने कधीच कोणाची हत्या केली नाही. करीम लाला आणि दाऊद यांच्यासारखे डॉन त्याचे चेले होते. मात्र दाऊदने हाजीची हत्या करून हाजीची सर्व सत्ता हडपली.
पुढे वाचा... मंदाकिनीपासून ते मोनिकापर्यंत, अंडरवर्ल्ड डॉनचे या अभिनेत्रींसोबत होते संबंध...