[सर्वात मागे डावीकडून रीमा, रणधीर कपूर, नीला, कंचन, शम्मी, संजना, शशि आणि जेनिफर. मध्ये डावीकडून बबिता राजकपूर, कृष्णा, नीतू, राजकपूर यांच्या मांडीवर करीना आणि कृष्णाच्या मांडीवर रिद्धिमा कपूर. खाली डावीकडून राजीव, आदित्य, करीश्मा आणि ऋषी कपूर]
मुंबई - कपूर घराणे भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठे घराणे आहेत. अभिनय तर या घराण्याच्या रक्तात आहे. याच कारणामुळे भारतीय सिनेसृष्टीच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत या घराण्याच्या प्रत्येक पीढीने अभिनय क्षेत्रात यशोशिखर गाठले आहे. दिवंगत पृथ्वीराज कपूर यांच्यापासून ते यूथ आयकॉन
रणबीर कपूरपर्यंत प्रत्येकाने या क्षेत्रात
आपले पाय रोवले आहेत. पृथ्वीराज कपूर यांनी देशाला पहिला बोलपट दिला होता. आज करीना, रणबीर त्यांच्या अभिनयाचा हा वारसा पुढे चालवत आहेत.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की कपूर घराणे मुळचे पाकिस्तानातील पेशावरमधील आहे. फाळणीनंतर ते भारतात स्थायिक झाले. या कुटुंबात हिंदू, जैन, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातील लोकांचा समावेश आहे. शशी कपूर यांनी हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर केंडलसोबत विवाह केला होता. तर त्यांची भाची रिमा कपूरचे लग्न मोहन जैनसोबत झाले आहे. इतकेच नाही तर
करीना कपूरचे पती
सैफ अली खान पतौडी घराण्याचे नवाब आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला कपूर घराण्याच्या सहा पिढ्यांबद्दल सांगत आहोत. शिवाय या घराण्यातील अशा काही सदस्यांविषयी सांगतोय, ज्यांच्याविषयी तुम्हाला ठाऊक नाहीये.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या पृथ्वीराज कपूर यांच्यापासून ते नव्या नवेली, सामरा साहनी, समायरा कपूरपर्यंत सर्वांविषयी..