आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'फू बाई फू - नया है यह'चा हास्यधमाका 21 एप्रिलपासून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी रसिक प्रेक्षकांना पोट धरून आणि पोट भरून हसविणारा 'फू बाई फू' या स्टॅंड अप कॉमेडी शोचा नवा सिझन येत्या 21 एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'फू बाई फू - नया है यह' असे या नव्या पर्वाचे नाव असून दर सोमवार आणि मंगळवारी रात्री 9.30 वा. झी मराठीवरून प्रसारित होणार आहे. या पूर्वीचे अनेक पर्व गाजवणा-या विनोदवीरांसोबतच काही नवीन कलाकारांची विनोदी फटकेबाजी यामध्ये बघायला मिळणार आहे. प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि 'दुनियादारी' फेम दिग्दर्शक संजय जाधव हे या नव्या पर्वासाठी परीक्षक म्हणून काम बघणार असून यापूर्वीच्या पर्वातील परीक्षक असलेल्या अश्विनी काळसेकर यांच्या सोबतीने ते गुणांकन देण्याचं काम करणार आहेत.
'फू बाई फू'च्या या नव्या पर्वातही मनोरंजन आणि हास्याचा असाच धमाका होणार आहे. या पर्वात दोन टीम समोरोसमोर उभ्या टाकणार आहेत. 'नया है यह' आणि 'नया है वह' अशी या टीमची नावे असून यात पहिल्या टिम मध्ये सुदेश म्हाशिलकर - सुरेखा कुडची, अजिंक्य जोशी - आरती वडगबाळकर आणि मागच्या पर्वाची विजेती जोडी भारत गणेशपुरे - सागर कारंडे बघायला मिळणार आहेत. तर नया है वह टीम मध्ये सुनील तावडे - शशीकांत केरकर, संकर्षण क-हाडे - श्रेया बुगडे आणि प्रियदर्शन जाधव - विशाखा सुभेदार या धमाल जोड्यांचा समावेश आहे. या व्यतिरीक्त विशेष परफॉर्मरच्या रुपात भाऊ कदम, सुप्रिया पाठारे आणि कुशल बद्रिके दिसणार असून त्यांना निवेदक डॉ. निलेश साबळेचीही साथ मिळणार आहे.
पुढे वाचा, स्पर्धकांना मिळणार संजय जाधवची जादू की झप्पी...