आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Fun Loving Clicks Of Abhishek Bachchan And Aishwarya Bachchan They Love To Cherish

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Fun loving Moments: पत्नी ऐश्वर्यावरुन हटतच नाही अभिषेकची नजर, तुम्हीच पाहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पत्नी ऐश्वर्यासोबतचे अभिषेकचे रोमँटिक क्षण...)

असे म्हटले जाते, की लग्नानंतर पती-पत्नीमधील प्रेम अधिकच वृद्धिंगत होत जाते. ही गोष्ट बी टाऊनच्या या क्युट कपलवर अगदी तंतोतंत जुळते. आम्ही बोलतोय ते अभिषेक आणि ऐश्वर्याविषयी. आज आपला 39 वा वाढदिवस साजरा करणारा अभिनेता अभिषेक बच्चन 20 एप्रिल 2007 रोजी ऐश्वर्यासोबत लग्नगाठीत अडकला. या दोघांना एक मुलगी असून तिचे नाव आराध्या आहे.
लग्नानंतर अनेकदा या दोघांचे रोमँटिक क्षण कॅमे-यात कैद झाले आहेत. रिअल लाईफमध्ये रोमँटिक असलेल्या या कपलने ऑन स्क्रिनही भरपूर रोमान्स केला आहे. कुछ ना कहो, सरकार राज, गुरु, उमराव जान, ढाई अक्षर प्रेम के या सिनेमांमध्ये हे दोघे एकत्र झळकले. खरं तर खासगी आयुष्यात या दोघांना एकत्र आणण्याचे श्रेय सिनेमांनाच जातं. अनेक जण सांगतात की, 'बंटी और बबली' सिनेमातील 'कजरारे कजरारे' या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांचे सुत जुळले. नंतर 'गुरु' सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांनी आपल्या प्रेमसंबंधांवर शिक्कामोर्तब केले.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अभिषेक आणि ऐश्वर्याची काही निवडक अशी छायाचित्रे दाखवत आहोत, ज्यामध्ये या दोघांमधील स्ट्राँग बाँडिंग स्पष्ट दिसून येते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा अभिषेक आणि ऐश्वर्याचे रोमँटिक क्षण...