आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनय आपटे यांच्यावर अंत्यसंस्कार, रंगभूमीवरील कलावंतांसह राजकीय नेत्यांचीही हजेरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता अशा विविध भूमिकांमधून रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे विनय आपटे यांच्यावर रविवारी दुपारी ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आपटे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील हजारो मान्यवरांची उपस्थिती होती.
अंधेरी येथील आपटे यांच्या निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, सचिन खेडेकर, सुनील बर्वे, वंदना गुप्ते, स्मिता तळवलकर, अशोक हांडे, अमृता सुभाष, मुक्ता बर्वे, रिमा लागू यांनी आपटे यांचे अंत्यदर्शन घेतले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील या वेळी उपस्थित होते.
अनेक पिढय़ा आणि कलाकार आपटे यांनी घडवले होते. रंगभूमीच्या इतिहासातील त्यांचे कार्य कोणालाही पुसता येणार नाही, असे उद्धव या वेळी म्हणाले. आपली मते ठामपणे मांडणे हा त्यांचा स्थायिभाव होता. त्याच्या अकाली निधनाने नाट्यसृष्टीबरोबरच मालिका आणि चित्रपटसृष्टीचीही मोठी हानी झाल्याचे वंदना गुप्ते यांनी सांगितले.