आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gangsters Open Fire At Bollywood Producer Ali Morani\'s Residence

सिनेमा निर्माता अली-करीम मोरानी यांच्या घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी केली फायरिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: सिनेमा निर्माता अली मोरानी आणि अभिनेता शाहरुख खान)
मुंबई: अंडरवर्ल्डने पुन्हा एकदा बॉलिवूडच्या कलाकारांवर निशाणा साधला आहे. शनिवारी (23 ऑगस्ट) रात्री मुंबईच्या जुहू परिसरात राहणारे सिनेमा निर्माता अली मोरानी आणि करीम मोरानी यांच्या घराबाहेर काही अज्ञात लोकांनी फायरिंग केली. अली मोरानी यांनी सांगितले, की काही दिवसांपूर्वी डॉन रवि पुजारीने त्यांना धमकीचे कॉल्स केले होते.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, शनिवारी (23 ऑगस्ट) रात्री उशीरा जुहू परिसरातील मोरानी यांच्या भावांच्या बंगल्या बाहेर दोन बाइकवरील अज्ञात लोकांनी फायरिंग केली आणि फरार झाले. मुंबईच्या एका पोलिस अधिका-याने या घटनेचे स्पष्टीकरण देताना सांगितले, की जुहू पोलिस स्टेशनमध्ये या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस या घटनेचा तपास घेत आहेत.
मोरानी भावांनी 'राजा हिंदुस्तानी', 'दामिनी'सारख्या सिनेमांच्या निर्माते म्हणून ओळखल्या जाते. करीम मोरानी शाहरुख खानचा 'रा-वन'च्या एग्झीक्युटीव्ह निर्मातासुध्दा होते. मोरानी यांच्या बंगल्यावरच नव्हे यापूर्वी बॉलिवूडमधील बोनी कपूर, फरहान अख्तर, अक्षय कुमार, सोनू निगम, प्रिती झिंटा आणि सलमान खानसह अनेक कलाकरांना अंडरवर्ल्डकडून धमकीचे फोन आलेले आहेत.