आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gauhar Khan & Sonakshi Visit Disney Land, Priyanka Spends Family Time

After IIFA moments:कोणी पोहोचले डिस्ने लँडमध्ये, तर कुणी केली पार्टी, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयफा अवॉर्ड्स 2014 सोहळ्याचे आयोजन 24 ते 26 एप्रिलदरम्यान यूएसमधील फ्लोरिडा शहरातील टेम्पा बे येथे करण्यात आले होते. या अवॉर्ड्स सोहळ्यादरम्यान बी टाऊन स्टार्सनी भरपूर धमाल-मस्ती केली.
आयफा सोहळा आटोपल्यानंतर अनेक स्टार्स आपल्या मायदेशी परतले. परतणा-या स्टार्समध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, राजकुमार हिरानी, फरहान अख्तर, आर माधवन, कायनात अरोरा, वीजे एंडी, ऐली अवराम, रितेश देशमुख, राकेश ओमप्रकाश मेहरासह बरेच सेलेब्सचा समावेश होता. अनेक सेलिब्रिटींनी घरी परतण्यापूर्वी यूएसमध्ये फिरण्याचे प्लानिंग केले होते.
प्रियांका चोप्रा -
प्रियांका चोप्राने यूएसमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवला. या सोहळ्याच्या माध्यमातून प्रियांकाला आपल्या आईसोबत बराच वेळ घालवण्याची संधी मिळाली होती.
सोनाक्षी सिन्हा आणि गौहर खान -
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आपल्या मित्रांसह डिस्ने लँडमध्ये पोहोचली होती. येथे तिने भरपूर धमाल मस्ती केली. तर गौहर खाननेसुद्धा डिस्नेमध्ये धमाल केली.
दिया मिर्झा आणि साहिल संघा -
दियाने तिचा भावी नवरा साहिल संघासोबत फ्लोरिडामध्ये चांगला वेळ घालवला. दियाने साहिलसोबत बीचवर खूप मस्ती केली.
हे सेलेब्ससुद्धा पोहोचले बीचवर -
फ्लोरिडाचे सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी बॉलिवूड सेलेब्स ऋचा चड्ढा, कल्कि कोचलीन आणि नवाजुद्दीन सिद्दीकीसुद्धा बीचवर पोहोचले होते.
अनेक स्टार्स पार्टीत होते बिझी -
आयफा अवॉर्ड्स सोहळ्याच्या निमित्ताने अनेक सेलेब्सना कामातून सुटी मिळाली होती. काही स्टार्स फ्लोरिडाचा फेरफटका मारायला गेले, तर काही स्टार्सनी पार्टी एन्जॉय केली. हृतिक रोशन, शाहिद कपूर, विवेक ओबरॉय, आदित्य रॉय कपूर, ऋचा चड्ढा, सिद्धार्थ मल्होत्रा, अदिती राव हैदरी या स्टार्सनी पार्टी एन्जॉय केली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या स्टार्सचे मस्तीचे क्षण...