आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PUBLICITY STUNT: गोहरच्या सांगण्यावरून मारली होती तिच्या थोबाडीत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(थप्पडकांडदरम्यान गोहर खान)
 
मुंबई- मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये अभिनेत्री गोहर खानसोबत एक धक्कादायक घटना घडली होती. गोहरला एका व्यक्तीने कानशिलात लगावली होती.  कानशिलात लगावणारी व्यक्ती अकील मलिकने खुलासा केला आहे, की त्याने गोहरच्या सांगण्यावरून तिच्या थोडाबीत मारली होती.
 
एका न्यूज चॅनलच्या बातमीनुसार, आरोपीने खुलासा केला, की गोहरनेच त्याला इंडियाज रॉ स्टारच्या फिलानेदरम्यान थोबाडीत मारण्यास सांगितले होते. आरोपीच्या सांगण्यानुसार, गोहरने सांगितले होते, की अर्जुन कपूर सेटवरून गेल्यानंतर त्याने सेटवर येऊन तिच्या थोबाडीत मारावी. एवढेच नव्हे, आरोपीने दावासुध्दा केला, की गोहरने त्याला याच्या बदल्यात सलमानसोबत \'दबंग 3\'मध्ये भूमिका देण्याचा शब्द दिला होता. सलमानसोबत काम करण्याच्या लालसेपोटी अकीलने गोहरच्या कानशिलात लगावली. अकीलने सांगितले, की गोहरने असे केवळ पब्लिसिटी स्टंटसाठी केले. त्या आरोपीने हा खुलासा केला, कारण गोहर आता आपल्या शब्दाला मुकारत आहे. गोहरने त्याला सिनेमात भूमिका देण्यास नाकारले आहे. आता अकीलच्या सांगण्यात किती सत्यता आहे हे गोहरलाच ठाऊक.
 
30 नोव्हेंबर रोजी लगावली होती गोहरच्या कानशिलात-
\'बिग बॉस 7\'ची विजेती, मॉडेल आणि अभिनेत्री गोहर खानला 30 नोव्हेंबर रोजी अकील मलिकने कानशिलात लगावली होती. त्यावेळी गोहर रिअॅलिटी शो \'इंडियाज रॉ स्टार\'च्या फिनालेचे शूटिंग करत होती. त्यावेळी मोहम्मद अकील मलिक नावाच्या व्यक्तीने तिच्या कानशिलात लगावली होती. पोलिसांच्या सूत्रांच्या सांगण्यानुसार, त्या व्यक्तीने सुरुवातीला तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला होता. गोहरने त्याच्या विरोध केल्यानंतर त्याने तिच्या कानशिलात लगावली.  
 
त्यावेळी पोलिसांना काय सांगितले आरोपीने-
अकीलला अटक करून बोरीवली कोर्टात आणण्यात आले होते. तिथून त्याला 4 डिसेंबरपर्यंत रिमांडवर पाठवण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या स्टेटमेंटमध्ये अकीलने सांगितले होते, की गोहरला शॉर्ट ड्रेसमधून मला थोडे खटकले. म्हणून मी तिच्या कानशिलात लगावली होती. वरिष्ठ निरीक्षक विलास चवन यांनी अकीलविषयी सांगितले होते, की मुलींना छोट्या-छोट्या कपड्यांमध्ये तो पाहून शकत नाही. गोहरचे वकील सदानंद शेट्टी यांच्या सांगण्यानुसार, अकीलच्या विरोधात भारतीय पॅनेल संहितेच्या कलम 354, 323 आणि 506 अंतर्गत प्रकरण नोंदवण्यात आले.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा \'इंडियाज रॉ स्टार\'च्या सेटवर थप्पडकांडदरम्यान गोहरची काही छायाचित्रे...