आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gauri, AbRam, Aryan, Suhana Spotted At Mumbai Airport

शाहरुखच्या कुटुंबाचे न्यू इयर सेलिब्रेशन आटोपले, एअरपोर्टवर दिसले गौरी, अबराम, आर्यन, सुहाना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- मुलगा अबराम आणि मुलगी सुहानासोबत गौरी खान)
मुंबईः अभिनेता शाहरुख खानने आपल्या कुटुंबीयांसोबत दुबईत न्यू इयर सेलिब्रेट केले. न्यू इयर
सेलिब्रेशन आटोपल्यानंतर शाहरुख रविवारी रात्री पत्नी गौरी आणि आपल्या तिन्ही मुलांसोबत मुंबईत परतला. विमानतळावर हे सर्वजण दिसले.
पहिल्यांदाच गौरी आणि तिचा धाकटा मुलगा अबराम एकत्र मीडियासमोर आले होते. आत्तापर्यंत अबरामची जेवढी छायाचित्रे समोर आली आहेत, त्यामध्ये तो एकटा किंवा आपल्या वडिलांसोबत दिसला. मात्र रविवारी पहिल्यांदाच तो आपल्या आईसोबत दिसला. यावेळी गौरीने अबरामला कडेवर घेतले होते. चेकचे शर्ट आणि ब्लू डेनिममध्ये चिमुकला अबराम खूप सुंदर दिसत होता. यावेळी शाहरुखचा थोरला मुलगा आर्यन आणि मुलगी सुहानासुद्धा गौरी आणि अबरामसोबत विमानतळावर दिसले.
शाहरुख खान गौरी, सुहाना आणि अबरामसोबत दुबईत दाखल झाला होता. तर आर्यन लंडनहून तिथे पोहोचला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मुंबई एअरपोर्टवर क्लिक झालेली गौरी आणि तिच्या तिन्ही मुलांची छायाचित्रे...