आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gauri Gadgil News In Marathi, Yellow Marathi Film, Divya Marathi

जिद्द अन् सकारात्मकतेचे दर्शन घडविणारे ‘यलो’ रिलेशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘मी असा कसा, असा कसा वेगळा..वेगळा’ म्हणण्याचे दिवस आता गेले. आता ‘मीच कसा वेगळा’ हे दाखवून देण्याचे दिवस आले आहेत..’ यलो चित्रपटाची खरीखुरी नायिका आणि एक विशेष मुलगी असलेली गौरी गाडगीळ आत्मविश्वासाने सांगत होती. ‘मराठीतील पहिली अस्सल नायिका’ असा गौरव झालेल्या जलतरणपटू गौरीची कथा मांडत दिग्दर्शक महेश लिमये यांनी या चित्रपटातून विशेष मुलांच्या प्रेरणादायी प्रवासावर प्रकाश टाकला आहे. 4 एप्रिलला प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटाच्या निमित्ताने ‘दिव्य मराठी’शी साधलेला संवाद ‘टीम यलो’च्याच शब्दांत..

वुई कॅन डू इट
माझ्याविषयी एक बातमी प्रसिद्ध झाल्यावर अभ्यास करून आईशी संपर्क साधत मला ‘पिक्चरमध्ये काम करणार का?’ असं विचारण्यात आलं. मी लगेच ‘हो’ म्हणाले. आई-बाबांच्या कष्टांचं चीज झालं आहे. मी काहीच केलेलं नाही. महेश, अंबर, उपेंद्र, मृणाल यांनी माझ्यावर प्रचंड कष्ट घेतले, त्यांना सॅल्यूट. या चित्रपटातून मी जलतरणात उच्च स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी काय केलं, ते सर्वांना कळेल. ‘यलो’ पाहून माझ्यासारख्या इतर मुलांनाच काय, कोणत्याही मुलांनाही ‘वुई कॅन डू इट’ असं वाटेल. - गौरी गाडगीळ, बालकलाकार

गौरीमुळेच सोपं झालं

विषय तसा अवघड होता. मी सिनेमॅटोग्राफर. दिग्दर्शक म्हणून माझा हा पहिलाच चित्रपट. दुसरी मुलगी घेऊन तिचा मेक-अप, अभिनय, वागणं यावर काम करावं लागणार होतं. पण, गौरीला भेटलो आणि सगळंच सोपं झालं. गौरीला फार शिकवावं लागलंच नाही. - महेश लिमये, दिग्दर्शक


रिसर्च महत्त्वाचा
हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर यांनी या चित्रपटाची संकल्पना मांडली. लेखनाच्या दृष्टीने रिसर्च महत्त्वाचा होता. वर्तमानपत्राच्या कात्रणांतच गौरीविषयी बातमी मिळाली आणि आम्ही गौरीला गाठलं. या विषयाचा आणि स्पेशली गौरीचा रिसर्च महत्त्वाचा होता. - अंबर हडप, गणेश पंडित, लेखक

पुढे वाचा मृणाल कुलकर्णी आणि उपेंद्र लिमये काय म्हणतात.......