(गौरी खान)
मुंबई: शाहरुख खानची पत्नी गौरी खान गुरुवारी (9 ऑक्टोबर) मुंबईमध्ये आयोजित एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती. या इव्हेंटमध्ये प्लॅनेट हॉलिवूड हॉटेलचे लाँचिंगची घोषणा करण्यात आली. तिच्यासह अभिनेता सचिन जोशीसुध्दा या इव्हेंटमध्ये सामील झाला होता.
या इन्हेंटमध्ये गौरी ब्लॅक गाऊनमध्ये दिसली. तिने हातात गोल्डन ब्रासलेट आणि कानात इअररिंग्स घातलेल्या होत्या. इव्हेंटमध्ये गौरीने केक कापला. या बुधवारी (8 ऑक्टोबर) 44वा वाढदिवस साजरा केला. तिच्या बर्थडे पार्टीत अनेक बॉलिवूड स्टार्स आले होते.
या इव्हेंटमध्ये सामील झालेला सचिन JMJ ग्रुप-इंडियाचा संचालक आहे. त्याने Wyndham Hotel Groupसोबत मिळून हॉटेल लाँचिंगची घोषणा केली. सचिन इव्हेंटमध्ये पत्नी उर्वशी शर्मासोबत पोहोचला होता. उर्वशीने 'नकाब', 'खट्टा मीठा'सारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सचे Pics...