(डावीकडूनः सुझान खान, भाग्यश्री पटवर्धन, शमिता शेट्टी आणि गौरी खान)
मुंबईः सुझान खान शुक्रवारी एका शॉप ओपनिंग इव्हेंटमध्ये सामील झाले. हे शॉप तिची बहीण सिमोन खानचे आहे. सिमोन इंटेरियर डिझायनर आहे. शॉप ओपनिंग इव्हेंटमध्ये तिच्या कुटुंबियांसह इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. येथे
शाहरुख खानची पत्नी गौरी
खानची विशेष उपस्थिती होती.
यावेळी गौरी कुर्ता आणि जीन्समध्ये दिसली. गौरी सिमोनची बहीण सुझानची बेस्ट फ्रेंड आहे. दुसरीकडे सुझान ब्राउन टाउजर आणि व्हाइट टॉपमध्ये होती. इव्हेंटमध्ये सुझानचे वडील संजय खान, आई जरीन खान, थोरली बहीण फराह खान अली, भाऊ जाएद खानची पत्नी मलायका खान सहभागी झाले होते.
शमिता शेट्टी, तनिषा मुखर्जी, आकांक्षा मल्होत्रा, मधु, पूनम ढिल्लो, डिझाइनर ऋषिका लुल्ला, भाग्यश्री पटवर्धनसोबत अनेक सेलेब्स सिमोनला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा खान फॅमिलीसोबत इतर सेलेब्सची छायाचित्रे...