आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gauri Khan To Launch Signature Line With Satya Paul

Meet the designer: गौरी खान बनली डिझायनर, सिग्नेचर कलेक्शन करणार सादर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः गौरी शाहरुख खान)

मुंबईः बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची पत्नी केवळ एवढीच गौरी खानची ओळख नाहीये. वेगवेगळ्या क्षेत्रात कुशल असलेली गौरी एकाचवेळी अनेक भूमिका साकारते. तिचा स्टाइल सेन्स अनेकांना प्रभावित करतो. व्होग मॅगझिनने गौरीला आपल्या कव्हरपेजवर स्थान देऊन फस्ट लेडी ऑफ बॉलिवूडचा किताब बहाल केला आहे.
फॅशन एक्सपर्ट्सच्या मते, गौरीची स्टाइल जबरदस्त आहे. आता आपली हीच स्टाइल गौरी सिग्नेचर कलेक्शनच्या रुपात सादर करणार आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर सत्या पॉलसोबत मिळून गौरी आपले नवीन कलेक्शन लाँच करणार आहे.
गौरीच्या नवीन कलेक्शनचे नाव 'द ट्रॉपिकल वंडर' असे आहे. सत्या पॉल ब्रॅण्डला 30 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने हे कलेक्शन सादर करण्यात येणार आहे. गौरीच्या कलेक्शनमध्ये साड्यांव्यतिरिक्त प्रिटेंड, सेपरेट्स, शीयर ट्युनिक्स, शिफ्ट ड्रेसेससुद्धा असतील. कलर्समध्ये तिने एक्वा, पेस्टल आणि साएट्रस शेड्सची निवड केली आहे.
आपल्या नवी कलेक्शनविषयी गौरीने सांगितले, "सत्या पॉल या प्रसिद्ध ब्रॅण्ड्सोबत काम करत असल्याचा आनंद आहे. माझ्या व्यक्तिमत्त्वातील विविध अंदाज तुम्हाला माझ्या कलेक्शनमध्ये बघायला मिळेल."
येत्या फेब्रुवारी महिन्यात हे कलेक्शन लाँच करण्यात येणार आहे. सत्या पॉलच्या सर्वच स्टोअरमध्ये हे कलेक्शन उपलब्ध असणार आहे.