आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • See The Glamorous Look Of Shahrukh Kahn\'s Wife Gauri Khan

B\'Day: गौरी आहे यशस्वी निर्माती आणि इंटेरियर डिझायनर, पाहा तिचा Glamorous Look

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शाहरुख आणि गौरी खान)

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 43 वर्षे पूर्ण केली आहेत. मुळची दिल्लीची असलेल्या गौरीचा जन्म एका सधन पंजाबी कुटुंबात झाला. दिल्लीतच गौरीचे बालपण गेले. शालेय शिक्षणानंतर दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमधून तिने इतिहास या विषयात पदवी प्राप्त केली.
यशस्वी निर्माती आणि इंटेरियर डिझायनर...
तीन मुलांची आई असलेली गौरी यशस्वी निर्माती आणि इंटेरियर डिझायनर आहे. शाहरुखच्या रेड चिलीज या प्रॉडक्शन हाऊसचे काम ती सांभाळते. काही दिवसांपूर्वीच शाहरुखने दुबईत रिअल इस्टेट व्यवसायात पदार्पण केले आहे. येथे त्याने 'रॉयल इस्टेट बाय शाहरुख खान' या नावाने रिअल इस्टेट्सचा बिझनेस सुरु केला आहे. या प्रोजेक्टअंतर्गत शाहरुख दुबईतील इन्व्हेस्टमेंट पार्कमध्ये 23 लाख चौरसफुटात हाऊसिंग कम्युनिटी डेव्हलप करणार आहे. विशेष म्हणजे या प्रोजेक्टमधील घरांचे इंटेरिअर गौरीने डिझाइन केले आहेत. ती नेहमी शाहरुखच्या खांद्याला खांदा लावून त्याच्यासोबत असते. त्याच्या कामाचा बराचसा व्याप गौरी स्वतः सांभाळते.
फॅशन आयकॉन गौरी...
आर्यन, सुहाना आणि अबराम या ती मुलांची आई असलेली गौरी फॅशनच्या बाबतीतही इतर अभिनेत्रींच्या एक पाऊल पुढे आहे. एखाद्या कार्यक्रमात कसा ड्रेस परिधान करायचा हे गौरीला चांगलेच ठाऊक आहे. फॅशन स्टाइल आयकॉन म्हणून गौरी खानला बी टाऊनमध्ये ओळखले जाते. तिचा ग्लॅमरस लूक कतरिना, प्रियांका आणि करीनाला मागे टाकतो. विशेष गोष्ट म्हणजे गौरी खान पडद्यावर अभिनय करत नाही, मात्र तिने स्वतःला मेन्टेन ठेवले आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि तुम्हीही बघा स्टाईल आयकॉन असलेल्या गौरीची खास छायाचित्रे...