आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Bigg Boss' विजेता गौतमच्या पहिल्या सिनेमाची घोषणा, शीर्षक असेल 'उडनछू'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून, गौतम गुलाटी, ब्रुना अब्दुल्ला आणि प्रेम चोप्रा)
मुंबईः 'बिग बॉस'च्या आठव्या पर्वाचा विजेता आणि अभिनेता गौतम गुलाटीच्या पहिल्या सिनेमाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. 'उडनछू' हे गौतमच्या पहिल्या सिनेमाचे नाव आहे. यामध्ये गौतम मेन लीडमध्ये झळकणार असून प्रेम चोप्रा, आशुतोष राणा, ब्रुना अब्दुल्ला आणि ब्रिजेन्द्र काला या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.
दिग्दर्शक विपिन पाराशर या सिनेमाद्वारे गौतमला मोठ्या पडद्यावर लाँच करणार आहे. यापूर्वी गौतम छोट्या पडद्यावर प्रसारित होणा-या 'दीया और बाती हम' या मालिकेत झळकला होता. 'बिग बॉस'च्या आठव्या पर्वात सहभागी होण्यासाठी त्याने ही मालिका सोडली होती.
'बिग बॉस'मध्ये एन्ट्री घेणे हे गौतमसाठी फायद्याचे ठरले. या शोमुळे तो केवळ प्रसिद्धीझोतातच आला नाही, तर शोचे विजेतेपदसुद्धा आपल्या नावी केले. आता गौतम बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाला आहे.
पुढे पाहा, 'उडनछू'च्या अनाउंसिंग इव्हेंटची छायाचित्रे...