आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Geeta basra dont want answer about harbhajan singh

हरभजनविषयी विचारल्‍यावर भडकली गीता बसरा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री गीता बसराचे नाव अनेक दिवसांपासून भारतीय क्रिकेट खेळाडू हरभजन सिंगसोबत जोडले जात आहे. पण या सततच्‍या चर्चांना ती आता कंटाळून गेली आहे.
गीता तिच्‍या चित्रपटांपेक्षा हरभजनची गर्लफ्रेन्‍ड म्‍हणूनच जास्‍त चर्चेत असते. गीताला प्रत्‍येक ठिकाणी चाहते तसेच पत्रकार हरभजनविषयीच प्रश्‍न विचारतात. नुकतेच दिल्‍ली येथील एक दुकानाच्‍या उदघाटनासाठी गीताला आमंत्रित केले होते. यावेळी जमलेल्‍या पत्रकारांनी तिला हरभजन आणि तिच्‍या नात्‍याविषयी काही खासगी प्रश्‍न विचारले. पण, गीताने त्‍या प्रश्‍नांना वैतागून उत्‍तरे देण्‍याचे टाळून त्‍याऐवजी मौनच पाळले.
गीता चिडून म्‍हणाली की, 'माझ्या खासगी गोष्‍टींविषयी जाणून घेण्‍याचा अधिकार कुणालाही नाही. मला माझे आयुष्‍य सार्वजनिक करायचे नाही. हरभजनविषयी काहीही बोलण्‍याची माझी इच्‍छा नाही.'
यावेळी गी‍ताशिवाय क्रिकेट खेळाडू आशिष नेहरा आणि मुरली कार्तिकसुद्धा आले होते.