आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ghungarachya Nadat New Marathi Movie Release On 28th February

\'घुंगराच्या नादात\' सिनेमा 28 फेब्रुवारीला येणार प्रेक्षकांच्या भेटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लावणी नृत्याला फार मोठी परंपरा लाभली आहे. तिला लोकाश्रय आणि दाद देणारे हौशी रसिक घुंगरांच्या तालावर बेफाम होऊन लावणीचा अस्वाद घेतात. परंतु या घुंगरांच्या नादाचा, बेफिकीरीचा अतिरेक झाला तर मात्र सर्वस्व गमवायला वेळ लागत नाही. अशाच कथा विषयावर बेतलेला निर्माते राजेंद्र संचेती यांचा 'घुंगराच्या नादात' हा लावणीप्रधान सिनेमा येऊ घातला आहे. 'संचेती ग्रुप' प्रस्तुत आणि 'आर, एस. प्रॉडक्शन' निर्मित 'घुंगराच्या नादात' या मराठी सिनेमाचे दिग्दर्शन आनंद बच्छाव यांनी केले आहे. 28 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.
घरातील कर्ता पुरूष व्यसनाधीनता आणि व्याभिचारी यांच्या आहारी गेल्यानंतर त्यांच्या संसारी आयुष्याची होणारी परवड आणि सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा रेखाटण्यात आला आहे. सिनेमाचे दिग्दर्शन आनंद बच्छाव यांनी केले असून पटकथा-संवाद आणि गाणी बाबासाहेब सौदागर यांनी लिहिले आहेत. '
घुंगराच्या नादात' या सिनेमामध्ये लावणी, युगलगीत, शिर्षक गीत आणि आयटम साँग अशी वेगवेगळी धाटणीची गीते आहेत. या सर्व गीतांना सुप्रसिध्द ज्येष्ठ संगीतकार नंदू होनप यांनी संगीत दिले असून सुरेश वाडकर, रविंद्र साठे, वैशाली सामंत, पंचमी यांच्या सुमधूर आवाजात ही गीते स्वरबध्द करण्यात आली आहेत.
सिनेमात संजय खापरे, लावणी नृत्यागंनेच्या भूमिकेत दिपाली सय्यद, अनंत जोग, प्रेमा किरण, सुनील गोडबोले, अनिकेत केळकर, भोजपूरी अभिनेत्री सिमा सिंह, यां कलावंतांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सिनेमाच्या संबंधीत काही छायाचित्रे...