आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gippy Grewal Will Be First Hindi Film With Govinda's Daughter

PICS : हा आहे गोविंदाच्या लेकीचा पहिला हीरो, पॉलिवूडमधून घेतोय बॉलिवूडमध्ये एन्ट्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गोविंदाची मुलगी नर्मदा ‘सेकंड हँड हसबन्ड' या आपल्या पहिल्या सिनेमात पंजाबी अभिनेता गिप्पी ग्रेवालसह झळकणार आहे.)
अमृतसह : पंजाबी गायक आणि अभिनेता गिप्पी ग्रेवाल लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. आगामी सेकंड हँड हसबन्ड या हिंदी सिनेमाद्वारे तो बॉलिवूडच्या पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमात तो गोविंदाची लाडकी लेक नर्मदासह स्क्रिन स्पेस शेअर करणार आहे. यावर्षी डिसेंबर महिन्यापासून या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. पुढील वर्षी जूनपर्यंत सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येण्याची शक्यता आहे.
लवकरच गिप्पीचा 'डबल दी ट्रबल' हा पंजाबी सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात त्याला अभिनेते धर्मेंद्रसह काम करण्याची संधी मिळाली आहे. या पंजाबी सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अमृतसरमध्ये पोहोचलेल्या गिप्पीने आपल्या पंजाबी सिनेामाविषयी आणि बॉलिवूड एन्ट्रीविषयीसुद्धा गप्पा मारल्या.
गिप्पी म्हणाला, धर्मेंद्र यांच्यासारख्या मोठ्या कलावंतासह काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा पहिला पंजाबी सिनेमा आहे, ज्यात धर्मेंद्र मेन लीडमध्ये झळकणार आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांचे भाऊ आणि निर्माते अशोक घई या सिनेमाचे निर्माते आहेत. अशोक घई यांनी यापूर्वी प्रेम दिवाने, राम लखन आणि जान या सिनेमांची निर्मिती केली आहे.
12.50 कोटींचा पहिला महागडा सिनेमा...
धर्मेंद्र यांच्यासह डबल दी ट्रबल या सिनेमात काम करण्याची संधी मिळाल्याने गिप्पी खूप उत्साहित आहे. त्याच्या मते, हा सिनेमा पंजाबी सिनेमांच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरेल. 12.50 कोटींचा निर्मिती खर्च असलेला हा पहिला महागडा पंजाबी सिनेमा आहे. पावै फुलकारी उत्ते वेल बुटियां या सिनेमाद्वारे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणा-या गिप्पीने आत्तापर्यंत दीडशेहून अधिक गाण्यांना स्वरसाज चढवला आहे.
'सेकंड हँड हसबंड'द्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री...
'सेकंड हँड हसबंड'द्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यास खूप उत्सुक असल्याचे गिप्पीने यावेळी सांगितले. नर्मदासह काम करण्याचा हा वेगळा अनुभव ठरेल आणि प्रेक्षकसुद्धा आपल्या कामाला पसंतीची पावती देतील, अशी आशा गिप्पीने यावेळी व्यक्त केली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अभिनेत्री नर्मदा आहुजा आणि अभिनेता गिप्पी ग्रेवालची निवडक छायाचित्रे...