आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Global Diversity Award To Sharukh, Divya Marathi

शाहरुखला ग्लोबल डायव्हर्सिटी अवॉर्ड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार शाहरुख खानला चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान तसेच सामाजिक कार्यातील सहभागासाठी ग्लोबल डायव्हर्सिटी अवॉर्ड-२०१४ ने सन्मानित करण्यात आले. ब्रिटनमधील हाऊस ऑफ कॉमन्सचे प्रवक्ते जॉन बेरकोव्ह यांच्या हस्ते ४८ वर्षीय शाहरुख खानला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कारनंतर प्रतिक्रिया देताना शाहरुख खान म्हणाला की, हा माझ्यासाठी विशेष दिवस असून रेन्बो फाउंडेशनतर्फे प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार मी नम्रतापूर्वक स्वीकारतो. या वेळी बोलताना शाहरुख खानने पहिल्या लंडन दौ-याच्या आठवणी ताज्या केल्या. यापूर्वी हा पुरस्कार बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या राय आदी प्रसिद्ध व्यक्तींना मिळाला आहे.