आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्यपडदा: अठरा वर्षांनी ‘गोलपीठा’ पुन्हा रंगमंचावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गाव तिथे पाणवठा आणि शहर तिथे ‘गोलपीठा’ असे म्हणत 1975 मध्ये सुरेश चिखले यांनी समाजातील या दुर्लक्ष भागाला लेखणीत उतरवले आणि मिलिंद पेडणेकर यांनी ही ‘कीड’ रंगमंचावर दाखवण्याचे धारिष्ट केले. तब्बल 18 वर्षांनी तोच ‘गोलपीठा’ व्यावसायिक रंगभूमीवर येत आहे.

राज्य नाट्य स्पर्धेच्या मुशीतून 1995 मध्ये ‘गोलपीठा’ उत्तमतेचा दर्जा घेऊन बाहेर पडले आणि दिग्दर्शक मिलिंद पेडणेकर यांनी तेव्हा याचे प्रयोग केले. वेश्या व्यवसाय करणार्‍यांच्या आयुष्याचे चित्रण करणारे नाटक ही एवढीच त्याची ओळख होती असे नाही तर त्यात वापरली गेलेली भाषा, स्त्रियांचे राहणीमान, सेक्सविषयी खुलेआम बोलणार्‍या वेश्या, गिर्‍हाइकांची मनधरणी करणार्‍या वेश्या असे भडक चित्रण त्या काळात केले होते. तोच ‘गोलपीठा’ पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवण्याचे आव्हान लेखक सुरेश चिखले आणि दिग्दर्शक मिलिंद पेडणेकर यांनी स्वीकारले आहे. या ‘गोलपीठा’ची मालकीण म्हणून अभिनेत्री सुरेखा कुडची हिची निवड करण्यात आली असून नवोदित कलाकारांनाही या नाटकात संधी देण्यात आली आहे. 2 जून रोजी पुण्याच्या बालगंधर्व येथे या नाटकाचा शुभारंभ होत आहे.

संहितेत बदल नाही
1975 मध्ये लिहिले गेलेले वेश्यांचे जग आज निश्चितच बदललेले असणार. मात्र आजच्या प्रेक्षकांना त्या वेळच्या गोलपीठांची ओळख व्हावी या दृष्टीने संहितेत अथवा नाटकात कोणतेही बदल केले नाहीत, असे दिग्दर्शक पेडणेकर यांनी सांगितले.