आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Good Singers Losing Identity Through Reality Shows: Reshammiya ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिअँलिटी शोमधून कलावंताची ओळख हरपते : रेशमिया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट - अनेक रिअँलिटी शोमध्ये सहभागी असलेला बॉलीवूड गायक-अभिनेता हिमेश रेशमियाला आता उपरती झाली आहे. अशा कार्यक्रमांमुळे कलावंताची ओळख हरपून जाते, असे त्याला वाटू लागले आहे.
38 वर्षीय हिमेश संगीतकार आहे. असे कार्यक्रम नवोदितांसाठी चांगली संधी निर्माण करून देत असले तरी कलावंतांसाठी मात्र हे ठिकाण स्वत्व हरवून टाकते. तरूण कलावंतांना याचा फायदा होतो, असे सांगून हिमेश म्हणाला, गायकांना आपले स्वत:चे अस्तित्व राहत नाही. बॉलीवूडमध्ये असलेल्या गायकांची संख्या तशी कमी आहे. त्यातही स्वत: ची ओळख असलेले गायक फारच थोडे आहेत. आपल्या कॉन्सर्टनिमित्त येथे आलेल्या हिमेशने पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी तो बोलत होता.
सलमान खानमुळे हिमेशला मोठा ब्रेक मिळाला. 1998 मध्ये ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटातून हिमेशने बॉलीवूडमधील खरी इनिंग खेळण्यास सुरुवात केली होती. सलमान भाईने मला माझ्या करिअरमध्ये सुरुवातीला केलेली मदत महत्त्वाची ठरते.