Home | Off Screen | Gorgeous Bollywood Divas Reveal Their Fitness Secrets

सेलेब्सचे FITNESS SECRETS, जे उघडतील त्यांच्या सौंदर्याचे रहस्य

दिव्य मराठी नेटवर्क | Update - May 07, 2014, 04:43 PM IST

सेलिब्रेटींची प्रत्येक अदा त्यांच्या चाहत्यांना भूरळ घालणारी असते. चाहते आपल्या आवडत्या नायक-नायिकांची नवीन स्टाइल फॉलो करत असतात. त्यांनाही सेलिब्रेटीप्रमाणे दिसण्याची आणि राहण्याची इच्छा असते.

 • Gorgeous Bollywood Divas Reveal Their Fitness Secrets

  सेलिब्रेटींची प्रत्येक अदा त्यांच्या चाहत्यांना भूरळ घालणारी असते. चाहते आपल्या आवडत्या नायक-नायिकांची नवीन स्टाइल फॉलो करत असतात. त्यांनाही सेलिब्रेटीप्रमाणे दिसण्याची आणि राहण्याची इच्छा असते.
  सेलिब्रिटींनासुध्दा इच्छा असते, की त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे फिटनेस सीक्रेट्स फॉलो करावे. म्हणून ते संधी मिळताच आपला फिटनेस फंडा सांगण्यास सुरूवात करतात. तुम्ही काही अभिनेत्रींना सीडीच्या माध्यमातून फिटनेस फंडा सांगतानासुध्दा बघितले असेल. याव्यतिरिक्त अनेक स्टार्स आपल्या मुलाखतीत फिटनेस संबंधीत टिप्स शेअर करत असतात.
  या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही सेलिब्रेटींच्या फिटनेस सीक्रेट्सविषयी सांगणार आहोत. त्यांच्या या फिटनेस टिप्सला फॉलो करून तुम्हीसुध्दा स्वत:ला फिट बनवू शकता.
  पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या तुमच्या आवडत्या स्टार्सच्या फिटनेस सीक्रेट्सविषयी...

 • Gorgeous Bollywood Divas Reveal Their Fitness Secrets
  जॅकलीन फर्नाडिस 
   
  जॅकलीन फर्नाडिस आपल्या सौंदर्यामुळे लाखो लोकांच्या मनावर राज्य करते. तिचे चाहते तिच्या चार्मिंग फेसचे दीवाने आहेत. जॅकलीनने 2006मध्ये मिस श्रीलंका यूनिव्हर्सचा किताब आपल्या नावी केला. 5 फुट 7 इंच उंच असलेली ही अभिनेत्री फॅशन एक्सेसरीजसह नवीन प्रयोग करत असते. 
  घरातच करत प्राणायम आणि योगा 
  जॅकलीनला जिममध्ये जाण्यास आवडत नाही. त्यामुळे ती घरीच योगा आणि प्राणायम करते. जॅकलीन स्वत:ची फिगर  फिट ठेवण्यासाठी डान्सिंग, स्विमिंगसुध्दा करते. ता सांगते, की स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगा करणे अत्यंत अवश्यक असते. 
   
  ट्रॅव्हलिंगची आवड 
   
  जॅकलीनविषयी सांगितले जाते, की ती कितीही व्यस्त असली तरी योगा आणि प्राणायमसाठी वेळ काढतेच काढते. जॅकलीनला ट्रॅव्हलिंगचीसुध्दा आवड आहे. ती नेहमी ऑस्ट्रेलिया, अमेरिका, न्यूयॉर्कसह अनेक देशांची ट्रॅव्हलिंग करत असते. 
   
  खाण्याची आवड 
   
  जॅकलीनला विविध पदार्थ खाण्याचीसुध्दा खूप आवड आहे. ती ज्या देशात जाते तेथील प्रसिध्द पदार्थांची ती चव घेते. आता असा प्रश्न पडतो, की जॅकलीन जर खाण-पाणाची इतकी आहारी आहे, तर ती तिच्या फिगरला कसे मेन्टेन करते. ती नियमीत व्यायाम आणि योगा करून स्वत:ला फिट ठेवते. 
 • Gorgeous Bollywood Divas Reveal Their Fitness Secrets
  यामी गौतम 
   
  यामीची स्माइलची तिचे चाहते प्रशंसा करतात. 'विकी डोनर'मधील यामीचा परफॉर्मन्स तिच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना प्रभावित करणारा होता. यामी चंदीगढचमध्ये लहानाची मोठी झाली आहे. तिला बॉलिवूडमध्ये येण्यात काहीच रुची नव्हती. परंतु तिच्या नशीबाने तिला बॉलिवूडपर्यंत आणले. 
   
  यामीला हॉट योगा आवडतो
   
  यामीला बॉलिवूडमध्ये तिच्या बॉडीमुळे ओळखले जाते. यामीला हॉट योगा आवडतो. यामीला दोरीच्या उड्या, बँड आणि स्लिंग करायला आवडते. यामीचे म्हणणे आहे, की ती तिच्या त्वचेच्या काळजीसाठी खूप पाणी पिते. याव्यतिरिक्त ती आपल्या त्वचेची खास काळजी घेत असते. 
 • Gorgeous Bollywood Divas Reveal Their Fitness Secrets
  तापसी पन्नू 
   
  तापसी पन्नू नवोदीत अभिनेत्री आहे. 'चश्मे बहाद्दूर' सिनेमामध्ये तापसीचा अभिनयाची लोकांनी खूप प्रशंसा केली. तिला पेंटालून मिस फ्रेश आणि साफी फेमिना मिस ब्यूटीफुल स्किन किताबाने 2008मध्ये ओळख मिळाली होती. तापसीला जिम जाण्यास आवडत नाही. तापसी म्हणते, की फिट राहण्यासाठी पुम्ही कोणताही व्यायाम करू शकता. परंतु जो करत आहात तो नियमीत करावा हे लक्षात असू द्यावे. 
   
  खाण्याविषयी तापसी सल्ला देते, की जेव्हा भूख लागेल तेव्हाच जेवण करा. भूख नसताना आणि जास्त खाल्ल्यास वजन वाढते. विशेष म्हणजे रात्री या गोष्टीचे ध्यान असू द्यावे. जास्त वेळ उपाशी राहू नये. तापसी आपल्या जेवणात उकडलेल्या पालेभाज्यांचा सामावेश करते. ती नियमीत फळांचा ज्यूस घेते. 
   
  तापसी म्हणते, की तिला बाहेरचे पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर ती स्वत:ला कधीच अडवत नाही. ती त्या दिवशी थोडा जास्त व्यायाम करते. 
 • Gorgeous Bollywood Divas Reveal Their Fitness Secrets
  शाहिद कपूर 
   
  शाहिद कपूर फिट राहण्यासाठी खूप मेहनत घेतो. शाहिद प्रत्येक दिवशी ट्रेडमिलवर 15 मिनीट वर्कआउट करतो. याव्यतिरिक्त तो रोज आपल्या एका किंवा दोन बॉडी पार्टवर वर्क करतो. शाहिदचे म्हणणे आहे, की 6 पॅक्ससाठी दररोज बॉडिच्या एक किंवा दोन पार्टवर काम करणे अत्यंत अवश्यक असते. 
   
  शाहिद जंक फुड खाणे नेहमी टाळतो. आरोग्याला उपयुक्त आणि पोषक पदार्थ खाणे त्याला आवडते. 
 • Gorgeous Bollywood Divas Reveal Their Fitness Secrets
  लारा दत्ता 
   
  लारा दत्ताचे म्हणणे आहे, की तिचा फिटनेस मंत्रा नो शॉटकर्ट आहे. ती डायटींग करत नाही. तिला जे आवडते ते ती खाते. लारा जंक फुड्स खाणे टाळते आणि दररोज योगा करते. 
 • Gorgeous Bollywood Divas Reveal Their Fitness Secrets
  इमरान खान 
   
  इमरान खानला जेवण बनवायला आवडतो. इमरान शुटिंगवर बाहेर गावी गेल्यास घरचे जेवण घेऊन जातो. त्याचे म्हणणे आहे, की तो खूप पोषक तत्व असलेला आहार घेतो. तो गोड पदार्थ आणि तेलाचे पदार्थ खाणे टाळतो. इमरान जेवणात चिकनचा सामावेश करतो. 
 • Gorgeous Bollywood Divas Reveal Their Fitness Secrets
  बिपाशा बसु 
   
  कदाचितच इंडस्ट्रीमध्ये असा कुणी व्यक्ती असेल ज्याला बिपाशाची बॉडि पसंत नसावी. ती तिच्या परफेक्ट फिगरसाठी ओळखली जाते. ती सतत आपल्या बॉडिच्या बाततीत सतर्क असते. बिपाशाला वर्कआउट करायला खूप आवडते. 
   
  बिपाशाने वर्ष 2010मध्ये फिटनेसवर आधारित स्वत:ची एक डिव्हिडी काढली होती. या डिव्हिडीचे नाव 'लव्ह युअरसेल्फ' होते. बिपाशा फिट राहण्यासाठी नियमीत योगा आणि व्यायाम करते. 
 • Gorgeous Bollywood Divas Reveal Their Fitness Secrets
  शिल्पा शेट्टी 
   
  शिल्पा शेट्टी इंडस्ट्रीच्या फिटनेसची आयकॉन म्हणून ओळखली जाते. शिल्पाच्या परफेक्ट वेस्टलाइनचा सर्वचजण प्रशंसा करतात. शिल्पाला फिट राहण्यासाठी वर्कआउट करण्यावर विश्वास नाहीये. परंतु वर्कआउट करणे तिला आवडते. 
  शिल्पा आपल्या परफेक्ट फिगरसाठी योगा आणि वेट ट्रेनिंग वर्कआउट करते. 
 • Gorgeous Bollywood Divas Reveal Their Fitness Secrets
  राहूल बोस 
   
  राहूल बोस माजी रग्बी खेळाडू आणि लाँग डिस्टेंस रनर आहे. राहूल बोस म्हणतो, की फिटनेसचा अर्थ केवळ सुंदर दिसणे असा होत नाही. जर तुम्हाला तुमची फिगर शेपमध्ये आणायची असेल तर तुमच्यासाठी खेळ खूप मोठे साधन आहे. राहूलसुध्दा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खेळ खेळतो.               
         
 • Gorgeous Bollywood Divas Reveal Their Fitness Secrets
   
  करीना कपूर डायटच्या बाबतीत खूप शिस्तप्रिय आणि कडक आहे. सांगितले जाते, की जे सेलिब्रेटी ट्रॅव्हलिंग करतात त्यांनी डायटमध्ये योग्य आहार घेणे अत्यावश्यक आहे. करीनाला याचा फायदा आहे कारण ती जर बाहेर गावी शुटिंग करत असली, तर तेथील हलका-फुलका आहार खाण्यास तिला कोणताही अडचण येत नाही. ती रोजच्या जेवणात खूप हलके आणि पोषक तत्वांनी भरलेला आहार घेते. जेवढे ती पोषक तत्वांची आहारात काळजी घेते तेवढे ती कॅलरीजच्या बाबतीत घेत नाही. तिला ज्यूस पिण्याऐवजी फळ खायला आवडते. याव्यतिरिक्त ती बंद पाकिटातल्या फळांऐवजी ताज्या फळांना प्राधान्य देते. 

Trending