आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gorgeous Priyanka Chopra Sizzles At Mary Kom Trailer

प्रियांकाने 'मेरी कोम'चा ट्रेलर केला लाँच, पाहा इव्हेंटची छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मेरी कोम' ट्रेलर लाँचिग इव्हेंटमध्ये संजयलीला भन्साळी आणि प्रियांका चोप्रा
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने मुंबईमध्ये पीव्हीआर सिटीमॉलमध्ये आगामी 'मेरी कोम' या सिनेमाचा ट्रेलर लाँच केला. ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये ती क्रॉप टॉप आणि मिडी स्कर्टमध्ये पोहोचली. यावेळी तिच्यासह सिनेमा दिग्दर्शक उमंग कुमार आणि निर्माते संजयलीला भन्साळी होते.
प्रियांकाने सांगितले, की 'मेरी कोम'मधील तिची भूमिका बॉक्सर, आई आणि होम मेकरची आहे. हे सर्व एकाचवेळी करण्यासाठी खूप कठिण होते. 'मेरी कोम'च्या पात्रासाठी प्रियांकाने खूप कष्ट घेतले आहेत. हा सिनेमा ऑलंम्पिक कास्यपदक मिळवणारी भारतीय बॉक्सर खेळाडू मेरी कोम हिच्या जीवनपटावर आधारित आहे. 5 सप्टेंबर रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होत आहे.

सिनेमाच्या ट्रेलर लाँचिंगवेळी प्रियांका चोप्राने सांगितले, की तिने मेरी कोमच्या भूमिकेला संपूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सिनेमात काही आहेत जे प्रेक्षकांने नक्की आवडतील. ट्रेलरमधील तिचा एक डायलॉग, 'डर को इतना भी मत डराओ कि डर ही खत्म हो जाये'.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'मेरी कोम'च्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटची छायाचित्रे...