आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गोविंदा'चा मुहूर्त, स्वप्निल जोशी कृष्णाच्या भूमिकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही वर्षांत दहीहंडी उत्सवाचे रुप बदलले आहे. उत्सवाच्या आडून केले जाणारे शक्तीप्रदर्शन उंच थराच्या बक्षिसासाठी राजकीय पथांची सुरु असलेली चढाओढ, या सगळ्यात दहीहंडी फोडणा-या मंडळांची सुरु असलेली रस्सीखेच, यावर भाष्य करणारा 'गोविंदा' हा मराठी सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.

नुकताच या सिनेमाचा मुहूर्त गायक शंकर महादेवन यांनी गायलेल्या गणेश वंदनेच्या गीत ध्वनीमुद्रणाने झाला. 'विघ्नविनाशक करुणासागर मोरया...' असे या गाण्याचे बोल आहेत. रोहन प्रधान यांनी या सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहेत.

आत्माराम धर्णे दिग्दर्शित या सिनेमात स्वप्नील जोशी, गिरीजा जोशी, अरुण नलावडे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे छोट्या पडद्यावरील 'कृष्ण' या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारा अभिनेता स्वप्नील जोशी या सिनेमातही कृष्णाच्याच भूमिकेत आपल्याला दिसणार आहे.

एकंदरीतच दहीहंडी फोडणा-या गोविंदाचा थरार आणि त्यासाठी त्यांना करावी लागणारी कसरत या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे.