('किल दिल'च्या पोस्टरवर गोविंदा)
मुंबईः दिग्दर्शक शाद अली यांच्या आगामी 'किल दिल' या सिनेमाचा फस्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमाच्या पोस्टर्सची थीम कलरफूल ठेवण्यात आली आहे. पोस्टरवर अभिनेता गोविंदा,
रणवीर सिंग, अली जाफर आणि
परिणीती चोप्रा हे स्टार्स झळकले आहेत. या स्टार्सचा अंदाजही कलरफूल दिसतोय.
या चारही स्टार्सचे वेगवेगळे पोस्टर्स काढण्यात आले आहेत. यामध्ये गोविंदाच्या पोस्टरची थीम गुलाबी ठेवण्यात आली असून गोविंदाने गुलाबी रंगाचा पँट आणि कथ्या रंगाचे शर्ट परिधान केले आहे. त्याच्या हातात एक गनसुद्धा दिसत आहे. या पोस्टरवर #WILLKILLFORPAISA असे लिहिण्यात आले आहे.
रणवीरच्या पोस्टरची थीम हिरव्या रंगाची आहे. त्याच्या पोस्टरवर #WILLKILLFORDIL असे नमूद करण्यात आले आहे. तर अली जाफरच्या पोस्टरची थीम निळ्या रंगाची असून त्याच्या हातात स्नाइपर गन दिसत आहे. त्यावर #WILLKILLFORDOSTI असे लिहिण्यात आले आहे. परिणीतीच्या पोस्टरची थीम पिवळ्या रंगाची आहे. ती जीन्स, शॉर्ट लेदर जॅकेट आणि पिवळ्या रंगाच्या टीशर्टमध्ये दिसत आहे. पोस्टरवर #WILLKILLFORPYAAR असे लिहिण्यात आले आहे.
'किल दिल' हा सिनेमा शाद अली दिग्दर्शित केले आहे. यापूर्वी त्यांनी 'साथिया', 'बंटी और बबली', 'झूम बराबर झूम' या सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. आदित्य चोप्रा या सिनेमाचा निर्माता आहे. यशराज बॅनरचा हा सिनेमा यावर्षी 14 नोव्हेंबर रोजी
बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा कलरफूल पोस्टर्सवरील स्टार्सचा अंदाज...