आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govinda's Daughter Changed Their Name For Bollywood Entry

गोविंदाच्या लेकीने बदलले नाव, नर्मदा नव्हे टीना नावाने करणार सिनेमात एंट्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- नर्मदा अर्थातच टीना अहूजा)
मुंबई: 'हीरो नं. 1' अर्थातच गोविंदा यांची मुलगी नर्मदा बॉलिवूडमध्ये एंट्री करत असल्याच्या बातम्या अनेकदा येऊन गेल्यात. यावेळी तिच्या पदार्पणाशी संबंधित आणखी एक नवीन गोष्ट समोर आली आहे. नर्मदा तिच्या ख-या नावासह बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार नाहीये. बातमी आहे, की बॉलिवूडमध्ये ती नर्मदा नव्हे टीना नावाने एंट्री करत आहे. टीना हे तिचे टोपण नाव आहे. बॉलिवूडमध्ये आपल्याला हेच नाव शोभेल असे नर्मदाला वाटते.
पंजाबी दिग्दर्शक स्मीप कांग यांच्या 'सेकंड हँड हस्बँड' या आगामी सिनेमात नर्मदा दिसणार आहे. या सिनेमात ती पंजाबी अभिनेता गिप्पी ग्रेवालसोबत काम करणार आहे. यावर्षी डिसेंबर महिन्यात सिनेमाचे शूटिंग सुरु होणार असल्याची शक्यता आहे.
सांगितले जाते, की नर्मदाचे वडील अर्थातच गोविंदा यांनीसुध्दा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आपले नाव बदलले होते. गोविंदाचे खरे नाव अरुण आहूजा आहे. इंडस्ट्रीमध्ये त्यांना गोविंदा नावाने लोकप्रियता मिळाली. आता नर्मदा, टीना नावाने किती लोकप्रियता मिळवते हे पाहणे रंजक आहे.
अंकशास्त्रानुसार बदलली आहे नावाची स्पेलिंग
बॉलिवूड अभिनेता गोविंदाला दोन मुले आहेत. मोठ्या मुलीचे नाव नर्मदा आहे. नर्मदाचा जन्म 16 जुलै 1989मध्ये झाला. तिने किशोर नमित कपूर इन्स्टिट्यूटमधून अभिनय क्षेत्राचा कोर्स केला. तिला एक छोटा भाऊ आहे. त्याचे नाव यशवर्धन आहे. नर्मदाने तिच्या नावाची स्पेलिंग बदललेली आहे दे कदाचितच कुणाला माहित असेल. ती पूर्वी 'Narmada' लिहत होते, परंतु अंकशास्त्रनुसार तिने नावात M आणि A जोडले आहे. आता ती 'Narmmadaa' लिहिते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गोविंदाची मुलगी नर्मदाची छायाचित्रे...