आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govinda\'s Daughter Narmada Ahuja Debut From Second Hand Husband

गोविंदाची मुलगी 70 एमएमवर पदार्पणासाठी सज्ज, \'सेकंड हॅण्ड हसबंड\'मधून करणार डेब्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - गोविंदाची मुलगी नर्मदा)
मुंबई - दीर्घ काळापासून या ना त्या कारणामुळे बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या मुलीचे बॉलिवूडमधील पदार्पण लांबणीवर पडत होते. मात्र आता चर्चा आहे, गोविंदाची लाडकी लेक नर्मदा आगामी 'सेकंड हॅण्ड हसबंड'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
या सिनेमात नर्मदासह अभिनेते धर्मेंद्र महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. समीप कंग हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. या सिनेमात नर्मदाच्या अपोझिट पंजाबी अभिनेता आणि गायक गिप्पी ग्रेवालला साइन करण्यात आले असून हा गिप्पीचा पहिला बॉलिवूड सिनेमा असेल.
गेल्या दोन वर्षांपासून नर्मदा बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार असल्याची चर्चा होती. याकाळात नर्मदाने तीसहून अधिक सिनेमांच्या ऑफर्स नाकारल्या असल्याचे एका मुलाखतीत नर्मदाची आई सुनीता यांनी सांगितले होते. नर्मदा आपल्या वडिलांप्रमाणे विनोदी सिनेमा करु इच्छित होती. त्यामुळे योग्य स्क्रिप्टच्या प्रतिक्षेत ती होती. आता तिची ही प्रतिक्षा संपली असून प्रेक्षक लवकरच नर्मदाला मोठ्या पडद्यावर बघू शकणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा नर्मदाची निवडक छायाचित्रे...