आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Govinda’S Daughter Narmmadaa To Debut In Bollywood

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तब्बल 30 सिनेमे नाकारल्यानंतर आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतेय गोविंदाची ही लाडकी लेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : गोविंदाची मुलगी नर्मदा आहूजा)
मुंबई - बॉलिवूडच्या स्टार किड्स ब्रिगेडमध्ये आणखी एक नाव सामील झाले आहे. बी टाऊनचा हीरो नंबर वन अर्थातच गोविंदाची लाडकी लेक नर्मदा आहुजा बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यास सज्ज झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नर्मदा पंजाबी सिनेमांचे दिग्दर्शक स्मीप कांगच्या आगामी सिनेमाद्वारे मोठ्या पड्दयावर पदार्पण करत आहे. या सिनेमात तिच्यासह पंजाबी सुपरस्टार गिप्पी ग्रेवाल झळकणार आहे. गिप्पीने यापूर्वी हनीसिंगसोबत 'अंग्रेजी बीट दे...' या प्रसिद्ध गाण्याला स्वरसाज चढवला आहे. हे गाणे 'कॉकटेल' या सिनेमात सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण यांच्यावर चित्रीत झाले होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नर्मदाचा पदार्पणातला पहिला सिनेमा हा विनोदी धाटणीचा असणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. अद्याप या सिनेमाचे शीर्षक गुलदस्त्यात आहे.
तीन वर्षांत नाकारले तब्बल 30 सिनेमे...
नर्मदा आहुजाने गेल्या तीन वर्षांत 30 सिनेमांची ऑफर नाकारली आहे. असे आम्ही नाही, तर खुद्द नर्मदाच्या आईनेच एका मुलाखतीत सांगितले. यावर्षी एप्रिल महिन्यात टेम्पा बे (फ्लोरिडा, यूएसए) मध्ये पार पडलेल्या आयफा अवॉर्ड सोहळ्यादरम्यान नर्मदाची आई सुनीता यांनी ही गोष्ट मीडियाला सांगितली होती. नर्मदा गेल्या ब-याच दिवसांपासून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याची चर्चा होती. याचविषयी सुनीता यांना विचारले असता, त्या म्हणाल्या, "गेल्या तीन वर्षांत नर्मदाने 30 सिनेमांच्या ऑफर नाकारल्या आहेत. तिला तिच्या वडिलांच्या सिनेमांप्रमाणे सिनेमा हवा आहे. ती कॉमेडी सिनेमाद्वारे पदार्पण करु इच्छिते. यासंदर्भात बोलणी सुरु आहेत. बघुयात पुढे काय होते." नर्मदावर कोणताही दबाव टाकण्याची इच्छा नसल्याचे सुनीता यांनी यावेळी सांगितले होते.
अंकशास्त्रानुसार बदलले नावातील इंग्रजी स्पेलिंग...
बॉलिवूड अभिनेता गोविंदाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचे नाव नर्मदा आहे. 16 जुलै 1989 रोजी नर्मदाचा जन्म झाला. तिने किशोर नमित कपूर इन्स्टिट्यूट आणि लंडन फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयात पदवी प्राप्त केील आहे. तिला धाकटा भाऊ असून त्याचे नाव यशवर्धन आहुजा असे आहे. नर्मदाचा अंकशास्त्रावर विश्वास आहे. तिच्या नावाचे इंग्रजी स्पेलिंग Narmada आहे. मात्र अंकशास्त्रानुसार तिने आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये M आणि A जोडून Narmmadaa असे केले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा नर्मदा आहुजाची आणखी 14 छायाचित्रे. ही सर्व छायाचित्रे इंटरनेटवरील विविध माध्यमांमधून साभार घेण्यात आली आहे.