आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नापूर्वीच सासरी पोहोचली सलमानची बहीण, केला गृहप्रवेश, पाहा Pix

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गृहप्रवेश करताना अर्पिता, सोबत आयुष शर्मा)
मुंबईः शुक्रवारी नवी दिल्लीत सुपरस्टार सलमान खानची बहीण अर्पिता हिच्या गृहप्रवेश सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. खरे तर लग्नानंतर वधूचा गृहप्रवेश होतो, मात्र सलमानच्या बहिणीने लग्नापूर्वीच आयुषच्या घरी गृहप्रवेश केला. अर्पिता आणि आयुषचे लग्न येत्या 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दोघांचेही कुटुंब लग्नाची जयत तयारी करत आहे. हैदराबाद येथील प्रसिद्ध फलकनुमा पॅलेसमध्ये हे दोघे बोहल्यावर चढणार आहेत. 19 नोव्हेंबरला पाठवणी आणि 21 नोव्हेंबरला मुंबईत रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.
हेलन आणि मलायका करणार परफॉर्मः
सलमानच्या घरचे महिलामंडळ अर्पिताच्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. सलमानच्या मैत्रिणी एली अवराम, डेजी शाह, संगीता बिजलानी यादेखील संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात मलायका अरोराची मदत करत आहेत. या कार्यक्रमात अर्पिताची आई आणि सलीम खान यांच्या दुस-या पत्नी हेलन परफॉर्म करणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय मलायका अरोरा खानचाही स्पेशल परफॉर्मन्स यावेळी होणार आहे. यासाठी सत्तरच्या दशकातील हिट गाण्यांसोबतच सलमानच्या हिट गाण्यांचे पॅकेज बनवण्यात आले आहे.
अमिताभ आणि शाहरुख यांची उपस्थिती निश्चितः
हैदराबादमध्ये होणा-या अर्पिताच्या लग्नाला अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान सहभागी होणार हे निश्चित झाले आहे. 21 नोव्हेंबर रोजी मुंबईत आयोजित वेडिंग रिसेप्शन पार्टीतदेखील दोघे सहभागी होणार असल्याचे समजते. याशिवाय शत्रुघ्न सिन्हा, आमिर खान, कतरिना कैफ, किरण राव, हेमामालिनी, धर्मेंद्र, करण जोहर, डेविड धवन यांच्यासमवेत बरेच सेलिब्रिटी लग्न आणि रिसेप्शनमध्ये सहभागी होणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अर्पिताच्या गृहप्रवेशाची छायाचित्रे...