Home »Hollywood» Grotesque Movie Banned In Many Countries

या सिनेमाच्या प्रदर्शनावर अनेक देशांनी घातली बंदी

वृत्तसंस्था | May 05, 2012, 16:40 PM IST

२००९ मध्ये तयार झालेल्या 'ग्रोटेस्क्यू या जपानी चित्रपटाच्या रिलीजवर अनेक देशांनी बंदी घातली आहे. या चित्रपटात खूपच हिंसक दृश्ये दाखवण्यात आली आहेत. या सिनेमात आपल्या पहिल्या डेटिंगवर जाणा-या तरुण-तरुणीचे अपहरण होते. अपहरणानंतर अपहरणकर्ता या दोघांना अतिशय क्रूर पद्धतीने टॉर्चर करतो. या सिनेमात माणसाच्या शरीरावर घातक वार करतांना दाखवण्यात आले आहे. याप्रकारच्या सिनेमांना स्प्लैटर हॉरर असे म्हटले जाते. हा सिनेमा सामान्य लोकांना बघण्यासारखा नसल्यामुळे या सिनेमाच्या रिलीजवर अनेक देशांनी बंदी घातली आहे. 'ग्रोटेस्क्यू' या चित्रपटावर खूप टीका झाली असून हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला आहे.

Next Article

Recommended