आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gul Panag Play Jigna Vora Character In Ab Tak Chapan Sequel

गुल पनाग साकारणार जिग्ना व्होराची भूमिका

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या गुल पनागच्या नावाची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये सुरु आहे. राम गोपाल वर्माच्या आगामी 'अब तक छप्पन'च्या सिक्वेलमध्ये गुल पनाग तडफदार पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी निवड झाल्यामुळे गुल आनंदात आहे.विशेष म्हणजे गुल पनाग साकारत असलेली भूमिका रिअल लाईफ भूमिकेशी साधर्म्य साधणारी असल्याचं बोललं जात आहे.जे डे हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या पत्रकार जिग्ना व्होराशी साधर्म्य साधणारी भूमिका गुल साकारणार आहे. 'अब तक छप्पन'च्या सिक्वेलमध्ये गुल पनाग शालू दीक्षित या पत्रकाराच्या भूमिकेत दिसेल. या सिनेमात शालू षडयंत्रामध्ये अडकून एका हत्येमध्ये आरोपी ठरते, अशी काहीशी भूमिका गुल पनाग साकारणार आहे. या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमात अभिनेत्यांबरोबर दिसणारी गुल पनाग एकमेव अभिनेत्री असणार आहे.