आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gulabi Cinema On 12 Subtember, Latest News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिग्दर्शक गुड्डू धनोआही मराठी इंडस्ट्रीत, १२ सप्टेंबरला \'गुलाबी\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- हिंदीमध्ये शाहरुखपासून सनी देओल, अक्षय कुमार, सैफ अली यांना घेऊन सुमारे १७ हिंदी चित्रपटांची निर्मिती दिग्दर्शन करणाऱ्या गुड्डू धनोआ यांनी आता मराठीत पाऊल टाकले आहे. बारबाला आणि पोलिसांदरम्यानचा संघर्ष दाखवणारा त्यांचा "गुलाबी' हा मराठी चित्रपट १२ सप्टेबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जय महाराष्ट्र बॅनरअंतर्गत तयार या चित्रपटात सचिन खेडेकर आणि पाखी हेगडे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

मराठीमध्ये दर्जेदार चित्रपट तयार होत असून प्रेक्षकांना असेच वेगळे चित्रपट आवडतात म्हणून मराठीत प्रवेश केल्याचे गुड्डू धनोआ यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांिगतले. मराठीकडे बॉलीवूडचे लक्ष गेल्याने अनेक मोठी नावे मराठी चित्रपटाशी जोडली जाऊ लागली आहेत. अजय देवगणने विटीदांडूची जबाबदारी घेतल्याने हा चित्रपट लगेचच टॉक ऑफ टाऊन झाला आहे.सिंघम रिटर्न्सबरोबर विटीदांडूचे प्रोमोज दाखवल्याने हिंदी प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट पोहोचला आहे.

चित्रपटाची कथा तयार झाल्यानंतर मी हा हिंदीमध्येच तयार करणार होतो. परंतु कथानक ऐकल्यानंतर मला वाटले की, हा चित्रपट मराठीत तयार केला तरच याला न्याय मिळेल. मराठी प्रेक्षक वेगळ्या, चांगल्या आणि सशक्त चित्रपटांना भरभरून प्रतिसाद देतात, हे आपण पाहिले आहे. त्यामुळेच मी हा चित्रपट मराठीत करण्याचे ठरवले, असे धनोआने या वेळी सांगितले. तुम्हाला मराठी येत नसताना संवाद आणि मराठी संस्कृतीशी हा चित्रपट कसा जोडलात, असे विचारले असता गुड्डू धनोआ म्हणाले, मला थोडी थोडी मराठी येते. पटकथेत एका बाजूला हिंदी आणि एका बाजूला मराठी संवाद होते. सचिन खेडेकर तसेच माझे काही मराठी मित्र असल्याने मी त्यांच्याशी संवादाबाबत चर्चा करीत असे.