आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gulzar Selected For Dadasaheb Phalke Award News In Divya Marathi

गॅरेज ते गीतकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फाळणीची वेदना घेऊन भारतात आलेले गुलजार यांचे मूळ नाव संपूर्णसिंग कालरा. आता पाकिस्तानमध्ये असणार्‍या पंजाबच्या झेलम प्रदेशातील दिना या गावी त्यांचा १८ ऑगस्ट १९३४ रोजी कालरा-अरोरा शीख कुटुंबामध्ये जन्म झाला. पुढे भारतात स्थिरावल्यानंतर त्यांनी गुलजार या टोपणनावाने लेखन करण्यास सुरुवात केली. त्याआधी दिल्लीत पेट्रोल पंपावर तसेच मुंबईत त्यांनी गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणूनही काम केले.

- चित्रपट क्षेत्रात त्यांनी गीतकार म्हणून करिअरला सुरुवात केली. बिमल रॉय व हृषीकेश मुखर्जी यांच्याबरोबर त्यांनी सुरुवातीच्या काळात काम केले. बिमल रॉय यांच्याच ‘बंदिनी’ या चित्रपटातील मोरा गोरा अंग लैले या गाण्याने त्यांच्या या क्षेत्रातील करिअरलारूढार्थाने प्रारंभ झाला आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

- कला क्षेत्रातील त्यांचे योगदान बघता केंद्र सरकारकडून २००४ मध्ये पद्मभूषण सन्मान देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या लघुकथा, कवितालेखनासाठी त्यांना २००२ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कारही देण्यात आला. चित्रपटांसाठी केलेल्या गीतलेखनासाठी त्यांना आजवर तब्बल २० फिल्मफेअर व अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

- आपल्या खास शैलीत लिहिणार्‍या गुलजार यांच्या कविता ‘रात पश्मीने की’,‘पंध्रह पाच पचहत्तर’, ‘चांद पुखराज का’ यांसारख्या कवितासंग्रहांमध्ये संकलित स्वरूपात बघायला मिळतात. धुवां रावीपार, ड्योढी यांसारखे लघुकथासंग्रह त्यांनी लिहिले.

- १९७१ मधील मेरे अपने या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले. परिचय, अचानक, इजाजत, आंधी, कोशिश, नमकीन यांसारखे चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केले. हॅलो जिंदगी, पोटली बाबा की, जंगल बुक यांसारख्या मालिकांसाठी त्यांनी गीते लिहिली.

- पटकथाकार म्हणूनही गुलजार यांनी या क्षेत्रात सशक्त लेखन केले. मिर्झा गालिब, मुन्शी प्रेमचंद यांच्या कथांवर तहरीर मुन्शी प्रेमचंद की यांसारख्या मालिकांची निर्मिती करून गुलजार यांनी मालिकाविश्वात उत्तम साहित्याची भर घातली. राहुल देव बर्मन यांना गुलजार गीतलेखनासाठी एक भक्कम प्रेरणादायी पाठिंबा मानत असत.

- अभिनेत्री राखी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांची मुलगी मेघना हिच्या ‘बोस्की’ या नावामागचे रहस्य गुलजार यांनी एकदा एके ठिकाणी सांगितले होते. वडिलांच्या फॅब्रिकच्या दुकानात काम करीत असताना त्या वेळी प्रसिद्ध असणार्‍या एका सिल्क फॅब्रिकच्या नावावरून ‘बोस्की’ हे नाव दिले. लाडक्या लेकीसाठी त्यांनी ‘बोस्की की कविता’ या संकल्पनेखाली काही अर्थपूर्ण कविताही लिहिल्या.