आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gurmeet Choudhary And Sapna Pabbi Turn Bold In Khamoshiyan

बॉक्स ऑफिसवर आज लागणार बोल्डनेसचा तडका, नवोदितांनी पदार्पणातच ओलांडल्या मर्यादा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सिनेमातील एका दृश्यात अभिनेता गुरमीत चौधरी आणि अभिनेत्री सपना पब्बी)
भट्ट कॅम्पचा 'खामोशियां' हा सिनेमा आज बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. या सिनेमाद्वारे सपना पब्बी पहिल्यांदाच सिल्व्हर स्क्रिनवर आपले नशीब आजमावणार आहे. तर छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध चेहरा गुरमीत चौधरीसुद्धा खामोशियां या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतोय. हे दोन्ही कलाकार आपल्या पहिल्याच सिनेमात बोल्ड झाले आहेत.
भट्ट कॅम्पच्या या सिनेमातदेखील बोल्डनेसचा तडका आहे. गुरमीत आणि सपना यांनी या सिनेमात बरेच बोल्ड सीन्स दिले आहेत. विक्रम भट्ट यांनी या सिनेमाची पटकथा लिहिली असून प्रेमाचे त्रिकोण यात दाखवण्यात आला आहे.
सपना पब्बी आणि गुरमीत चौधरी यांच्यासह अली फजल या अभिनेत्याची महत्त्वपूर्ण भूमिका सिनेमात आहे. आता कलाकारांच्या या बोल्डनेसचा फायदा कितपत सिनेमाला होणार हे लवकरच स्पष्ट होईल.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सपना आणि गुरमीतच्या बोल्डनेसची झलक...