आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gurmeet Ram Rahim Movie \'MSG: Messenger Of God\' Premiere

राम रहिम यांच्या \'MSG\'चा झाला प्रिमिअर, पोहोचले बी-टाऊन सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- विंदू दारा सिंह, फ्लोरा सैनी आणि जयश्री सोनी)
मुंबई- रिलीजपूर्वी वादात अडकलेला राम रहिम यांचा 'MSG: मॅसेंजर ऑफ गॉड' सिनेमा शुक्रवारी (13 फेब्रुवारी) रिलीज होत आहे. बुधवारी (11 फेब्रुवारी) या सिनेमाचा प्रिमिअर आयोजित करण्यात आला होता. या प्रिमिअरमध्ये अनेक बॉलिवूड सेलेब्सनी उपस्थिती लावली.
यावेळी डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहिमसुध्दा उपस्थित होते. राम रहिम यांनी सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे. त्यांच्यासह फ्लोरा सैनी, जयश्री सोनी, रिंगझिंग डँग्जोप्पा, विंदू दारा सिंह, रमेश तौराणी आणि इतर सेलेब्ससुध्दा दिसले. 'MSG: मॅसेंजर ऑफ गॉड' यापूर्वी 16 जानेवारीला रिलीज होणार होता. मात्र वादात अडकल्याने त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती.
सिनेमात डेराच्या प्रमुखांनी स्वत: देवाची उपमा दिली होती, असे सेन्सॉर्स बोर्डाचे म्हणणे होते. मात्र, डेराच्या प्रमुखांनी यावर सांगितले होते, की त्यांनी स्वत:ला देवादूत म्हणून सादर केले आहे, देवाचे रुप म्हणून नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या सिनेमाच्या प्रिमिअरला पोहोचलेल्या सेलेब्सचे फोटो...