(फोटो- गुरमीत राम रहीम आणि फ्लोरा सैनी)
मुंबईः रिलीजपूर्वीच वादाच्या भोव-यात अडकलेल्या 'MSG: द मेसेंजर ऑफ गॉड' या सिनेमाच्या कलाकारांनी सोमवारी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी सिनेमात मुख्य भूमिका साकारणारे गुरमीत राम रहीम यांच्यासह सर्व कलाकार उपस्थित होते.
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह यांचा 'MSG: द मेसेंजर ऑफ गॉड' हा सिनेमा 16 जानेवारी रोजी रिलीज होणार होता. मात्र निर्माण झालेल्या वादामुळे सेन्सॉर बोर्डाने सिनेमाच्या रिलीजवर बंदी घातली आहे.
या पत्रकार परिषदेत राम रहीम यांनी सिनेमाचा सिक्वेल बनवण्याची त्यांची योजना असल्याचे सांगितले. या सिनेमात फ्लोरा सैनी, जयश्री
सोनी, गौरव गेरा या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यावेळी फ्लोरा ग्लॅमरस अंदाजात तर राम रहीम रॉकिंग लूकमध्ये दिसले.
सेन्सॉर बोर्डाच्या मते, सिनेमात डेरा प्रमुखने स्वतःला देव असल्याचे सांगितले आहे. तर डेरा प्रमुखचे म्हणणे आहे, की सिनेमात त्याने स्वतःला देवाच्या नव्हे तर देवाच्या दुताच्या रुपात सादर केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'MSG: द मेसेंजर ऑफ गॉड'च्या पत्रकार परिषदेतील छायाचित्रे...