आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किडनी फेल झाल्यामुळे गुरुदत्त यांच्या 58 वर्षीय मुलाचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : अरुण दत्त)
पुणे - गतकाळातील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक दिवंगत गुरुदत्त यांचा मुलगा अरुण दत्त यांचे 26 जुलै रोजी पुण्यात निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. अरुण दत्त यांची कन्या गौरी दत्त यांनी सांगितल्याप्रमाणे, किडनी फेल झाल्यामुळे त्यांचे निधन झाले.
गौरी यांनी सांगितले, "शनिवारी माझ्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या वर्षभरापासून अत्यवस्थ होते. त्यांची किडनी फेल झाली होती. रविवारी रात्री पुण्यात त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले."
अरुण दत्त पुण्यातील गुरुदत्त फिल्म अॅक्टिंग अकॅडमीचे अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी कविता आणि दोन मुली गौरी आणि करुणा आहेत.