आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXPERT VIEW: दसऱ्याला बॉक्स ऑफिसची दिवाळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बँग बँग' आणि 'हैदर' रिलीज झाले आहेत. 2 ऑक्टोबरला सरकारी सुटी असल्यामुळे दोन्ही चित्रपट गुरुवारीच प्रदर्शित करण्यात आले. जगभरात प्रिंट प्रचाराच्या खर्चासहित निर्माता फॉक्स स्टार स्टुडिओला 'बँग बँग'वर 150 कोटी रुपये खर्च येईल. प्रदर्शनापूर्वी सॅटेलाइट आणि संगीत अधिकार विकून 50 कोटी रुपयांची वसुली झालेली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या प्रोमोने प्रेक्षकांच्या मनात चित्रपट पाहण्याविषयीची जिज्ञासा निर्माण केली आहे.
परदेशामध्येदेखील चित्रपटाचा चांगला व्यवसाय होण्याची अपेक्षा आहे. यामागे तीन कारणे आहेत. पहिले म्हणजे, फॉक्स स्टार आंतरराष्ट्रीय स्टुडिओ असून आपल्या ताकदीच्या बळावर ज्या देशात साधारणत: हिंदी चित्रपट रिलीज होत नाहीत त्या ठिकाणी हा स्टुडिओ 'बँग बँग' रिलीज करेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर हृतिक आणि कतरिनाची लोकप्रियता हे दुसरे कारण आहे. तर तिसरे कारण म्हणजे 'नाइट अँड डे' या चित्रपटाची ही हिंदी आवृत्ती आहे. विशाल भारद्वाज नेहमी थोडे हटके चित्रपट बनवण्यामध्ये वाकबगार आहेत. 'हैदर' शेक्सिपअरच्या हॅम्लेटवर आधारित असून व्यावसायिक समीकरण हे चित्रपटाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. प्रिंट प्रचाराच्या खर्चासहित यूटीव्हीला हा चित्रपट 40 कोटींमध्ये पडणार आहे. ख‌र्च भरून काढल्यावर यूटीव्ही आपल्या गुंतवणुकीवर कोणत्याही प्रकारचे व्याज अथवा कमिशन घेणार नाही.
गुरुवार ऑक्टोबर ते सोमवार ऑक्टोबरपर्यंत पाच दिवसांचा हा वीकेंड या वर्षातील सर्वात मोठा आहे. या वीकेंडमध्ये दोन मोठे चित्रपट रिलीज झाले आहेत. त्यामुळे दसऱ्याला बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात लक्ष्मीचा वर्षाव होईल, अशी अपेक्षा आहे.