आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिद-श्रद्धाने केले 'हैदर'चे प्रमोशन, पाहा खास PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रमोशनवेळी श्रद्धा कपूर आणि शाहिद कपूर)
मुंबई - शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूर हे स्टार्स आगामी 'हैदर' या सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले असून या दोघांनी सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. अलीकडेच प्रमोशनच्या निमित्ताने दोघेही मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांच्यासह सिनेमाचे दिग्दर्शक विशाल भारद्वाजसुद्धा दिसले.
या इव्हेंटमध्ये श्रद्धा शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसली. तिने केस मोकळे ठेवले होते. तर दुसरीकडे शाहिद कपूर टी-शर्ट आणि ट्राउजरमध्ये दिसला. प्रमोशनवेळी हे दोघेही एकमेकांचा चेहरा पकडून ओढत होते. इव्हेंट आटपून बाहेर पडताना दोघांनीही एकमेकांना अलिंगन दिले आणि आपापल्या गाडीतून परतले.
'हैदर' हा सिनेमा यावर्षी 2 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. शाहिद आणि श्रद्धासह तब्बू आणि के.के.मेनन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका सिनेमात आहेत. विलियम शेक्सपिअर यांच्या 'हेल्मेट'वर हा सिनेमा आधारित आहे. सिनेमाचे एकुण बजेट 37 कोटी आहे. यापैकी 22 कोटी सिनेमाच्या प्रॉडक्शनवर तर 15 कोटी प्रमोशनवर खर्च करण्यात येणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा इव्हेंटमध्ये क्लिक झालेली श्रद्धा-शाहिदची खास छायाचित्रे...